आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...आणि माझी भीती खरी ठरली- सोनियांनी जागवली राजीवजींच्या हत्येची आठवण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपले पती राजीव राजकारणात गेले तर त्यांची हत्या होईल अशी सतत भीती सोनियांना वाटायची. - Divya Marathi
आपले पती राजीव राजकारणात गेले तर त्यांची हत्या होईल अशी सतत भीती सोनियांना वाटायची.

मुंबई- मी एका वेगळ्या वातावरणातून आले होते. मात्र, राजीवसोबत लग्न झाल्यानंतर माझे जग बदलले. तरीही राजीव यांनी राजकारणातून जाऊ नये असेच मला वाटत होते. राजीव राजकारणात गेले तर त्यांची हत्या होईल अशी मला सतत भीती वाटायची आणि यामुळेच माझा राजकारणात जाण्याला विरोध होता. मात्र, इंदिरा गांधी यांची हत्या झाली आणि सर्व काही बदलले. पण पुढे माझी भीती खरी ठरली अशी कटू आठवण काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज मुंबईत सांगितली.

 

इंडिया टुडे समुहाने आयोजित केलेल्या इंडिया कॉनक्लेव्ह 2018 या कार्यक्रमात सोनिया गांधींना निमंत्रित केले गेले होते. त्यावेळी त्यांनी राजीव यांच्या राजकारणात येण्याला विरोधमागचे कारण सांगितले.

 

सोनिया यांना आणखी एक प्रश्न विचारला की, 2004 मध्ये तुम्ही स्वत: पंतप्रधान होण्याऐवजी मनमोहन सिंह यांना पुढे का केले यावर त्या म्हणाल्या, मला त्यावेळी वाटले माझ्यापेक्षा मनमोहन सिंग अधिक चांगले नेतृत्त्व देऊ शकतात. मला माझ्या मर्यादा माहित होत्या, त्यामुळे त्यांच्याकडे पंतप्रधानपद देण्याचा निर्णय घेतला असे त्या म्हणाल्या.

 

गांधी घराण्याशिवाय काँग्रेस पक्षाचे काय भवितव्य राहील असे आपल्याला वाटते या प्रश्नावर सोनिया म्हणाल्या, आपल्या देशात लोकशाही आहे. लोकशाहीमुळे काँग्रेस पक्षाकडे वेगवेगळ्या राज्यातून निवडून येणारे अनेक नेते आहेत आणि या नेत्यांकडेही काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळण्याची क्षमता आहे असे त्या म्हणाल्या. 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तुम्ही काय सल्ला द्याल? असा सवाल केला असता सोनियांनी मोदींना चिमटा काढत, ते कोणाचे ऐकतात का? असा प्रतिसवाल केला. सोबतच त्यांच्याकडे सल्ला देणारी अनेक मंडळी आहेत असे सांगत मोदींच्या थिट टॅंकला व आरएसएसला टोला हाणला.

 

पुढे स्लाईडद्वारे वाचा, इंदिरांची हत्या अन त्यानंतर अवघ्या सात वर्षात राजीव गांधींची झाली हत्या...

बातम्या आणखी आहेत...