आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोव्‍यात सार्वजनिक ठिकाणी दारू पिल्‍यास भरावा लागेल एवढा दंड, लवकरच अध्‍यादेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पणजी - सार्वजनिक ठिकाणी दारू पिल्‍यास मोठा दंड आकारण्‍यात येईल, अशी माहिती गोव्‍याचे मुख्‍यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिली आहे. यासाठी सरकारतर्फे लवकरच एक अध्‍यादेश जारी केला जाणार आहे. यानूसार सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्‍यास मनाई करण्‍यात येणार आहे. ऑगस्‍टपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.


2500 रूपये लागेल दंड
- मुख्‍यमंत्री पर्रिकर यांनी याविषयी माहिती दिली की, 'यापुढे सार्वजनिक ठिकाणी कोणी दारू पिताना आढळल्‍यास त्‍यांच्‍यावर दंडाची कारवाई करण्‍यात येणार आहे. आम्‍ही लवकरच यासंबंधी अध्‍यादेश जारी करणार आहोत. ऑगस्‍टमध्‍येच याचा जीआर काढला जाईल. जेणेकरून 15 ऑगस्‍टपूर्वी या निर्णयाची अंमलबजावणी करता येईल. या नियमाचे उल्‍लघंन केल्‍यास 2500 रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाईल.

 

अस्‍वच्‍छता पसरवणा-यावर होणार कारवाई
- बीअरच्‍या रिकाम्‍या बॉटल्‍स रस्‍त्‍यावर फेकणा-यांवरही कारवाई केली जाईल, असे मनोहर पर्रिकर यांनी सांगितले आहे. ते म्‍हणाले, 'रिव्‍हर फ्रंट परिसरात बॉटल्‍स फेकताना मी काही विद्यार्थ्‍यांना पकडले होते व याबद्दल त्‍यांना इशारा दिला होता.'

बातम्या आणखी आहेत...