आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईतील रस्त्यांवर धावतेय हाॅर्नने सजवलेली रिक्षा, जाणून घ्या काय आहे यामागील सत्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. शहरात काही दिवसांपासून हाॅर्नने सजलेली एक रिक्षा लोकांना आकर्षित करत आहे. महाराष्ट्र राज्य  आवाज फाउंडेशनने परिवहन विभागाच्या व रिक्षा युनियनच्या सहकार्याने 'हाॅर्नव्रत अभियान' सुरु केले आहे. भारतातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहने असल्याने वायू प्रदुषणाबरोबरच ध्वनी प्रदुषणही मोठ्या प्रमाणात होते. हाय डेसीबलमुळे माणसांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो हे अनेक मेडिकल रिसर्चमधून समोर आलेले आहे. याबाबत जागृती व्हावी म्हणून हे अभियान सुरु केले गेले आहे. 

 

या अभियानअंतर्गत एका आॅटो रिक्षाला पूर्णपणे हाॅनने सजवलेले आहे. तसेच हाॅर्न नको अशी विनंती ही लिहिली आहे शिवाय हे देखील लिहिले आहे की मुंबईत प्रत्येक तासाला 1 कोटी 80 लाख पेक्षा जास्त वेळा हाॅर्न वाजवला जातो. हाच संदेश मुंबईकरांना देण्यासाठी या आॅटो रिक्षाचा वापर केला जातोय. मुंबईतील वेगवेगळ्या भागात ही रिक्षा फिरत आहे. 


मुंबईत राहणा-या काही लोकांनी सांगितले की अरुंद गल्ल्यांमधील सडकांवरुन येण्या-जाण्यासाठी हाॅर्न वाजवणे गरजेचे आहे तर काही लोकांचे म्हणणे आहे की ध्वनी प्रदुषणाबद्दल जागरुकतेचा अभाव हीच यामगची खरी समस्या आहे. WHO नुसार माणसाच्या कानासाठी 70 डेसिबल पर्यंच्या आवाजाची मर्यादा योग्य आहे. पण भारतात विनाकारण रस्त्यावर हाॅर्न वाजवल्याने हा स्तर 110 डेसिबल पर्यंत पोहचतो. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ शकतो. 

 

पुढील स्लाईडवर पहा आणखी फोटो..

 

बातम्या आणखी आहेत...