आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ST: संप दुसर्‍या दिवशीही सुरुच, पावसात प्रवाशांचा खोळंबा, राज्यभरात शेकडो कर्मचार्‍यांचे निलंबन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- वेतनवाढीवर नाखुश असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी रात्रीपासून अघोषित संपाला सुरुवात केली आहे. कर्मचा-यांचा संप आजही सुरु आहे. राज्यभरातील जवळपास 90 आगारातील सेवा पुर्णपणे ठप्प झाल्याने प्रवाशांचा दुस-या दिवशीही खोळंबा झाला आहे. शुक्रवारी हा संप मोडून काढण्यासाठी सरकारने कर्मचा-यांची धरपकड सुरु केली होती, तसेच शेकडो कर्मचा-यांचे निलंबन केले होते मात्र तरीही आजही संप सुरु आहे.

 

मुंबईतील परळ डेपोतून शनिवारी सकाळी एकही बस बाहेर पडली नाही. तर पालघर विभागातील 8 आगारातील 80 टक्के फे-या रद्द करण्यात आल्या आहे. ठाण्यात देखील अनेक फे-या रद्द करण्यात आले आहेत. पुण्यात बाहेरगावच्या शिवशाही बसेस आणण्यात आल्या आहेत. शुक्रवारच्या तुलनेत शिवशाहीची सेवा वाढवण्यात आली आहे मात्र साधी व एशियाड बससेवा अद्यापही पूर्ण ठप्प आहे. 

 

अचानक काम बंद करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात एसटी प्रशासनाने कारवाईला सुरवात केली. राज्यभरात शेकडो कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं. एकट्या बीड जिल्ह्यात १२१ जणांना सेवेतून तडकाफडकी निलंबित करण्यात आले तर यवतमाळ जिल्ह्यातील एकूण 9 आगारातील 46 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. नाशिक आगारातील काही जणांचे निलंबन मागेही घेण्यात आलं. पण मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. निलंबनं झाली तरी संप सुरुच ठेऊ, असा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

 

बातम्या आणखी आहेत...