आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ST कर्मचार्‍यांचा संप मोडून काढण्यासाठी पोलिसांकडून धरपकड; 81 निलंबित, कामगार सेनेचा संपाला विरोध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/उस्मानाबाद- मध्यरात्रीपासून सुरु असलेला एसटी कर्मचा-यांचा संप मोडून काढण्यासाठी पोलिसांनी धरपकड सुरु केली आहे. आतापर्यंत 20 कर्मचा-यांनी ताब्यात घेण्यात आले आहे.  कर्तव्य न बजावता संपात सहभागी झाल्याबद्दल राज्यभरातील 81 कर्मचार्‍यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. तर अंबाजोगाई 14 तर यवतमाळमध्ये 44 जणांना निलंबित करण्यात असून उस्मानाबादमध्ये 3 कर्मचा-यांना अटक करण्यात आली आहे. 

 

संपाबाबत कोणतेही अधिकृत पत्र देण्यात आलेले नाही. एसटी कर्मचाऱ्यांचा हा अधिकृत संप नाही, पूर्व सुचना न देता कर्मचारी कामावर गैरहजर राहिले आहेत. त्यांच्यावर प्रशासन योग्य कारवाई करेल आणि वेतनवाढ मान्य नसेल तर कर्मचाऱ्यांनी औद्योगिक न्यायालयात जाऊन दाद मागावी, असे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले आहे.

 

दरम्यान, मुंबईत परळ आगारातून एसटी सोडण्यास विरोध करणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उस्मानाबादमध्येही 14 संपकरी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ठाणे आगारातील संप करणाऱ्या 4 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तर उस्माबादमध्ये वाहतूक नियंत्रकाला निलंबित करण्यात आले आहे. औरंगाबाद संपाचा फारसा परिणाम जाणवला नाही. 

 

कामगार सेनेचा संपाला विरोध 
गेल्या 45 वर्षांत एसटी कर्मचाऱ्यांची पगार वाढ झाली नाही, तेवढी पगारवाढ परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे. त्यामुळे आजचा संप बेकायदेशीर आणि फसवा असल्याचा दावा शिवसेना प्रणित कामगार सेनेने केला आहे.

बातम्या आणखी आहेत...