आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपकरी १०१० राेजंदारी कर्मचाऱ्यांना 'एसटी' पुन्हा सेवेत घेणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- वेतनवाढीच्या मागणीसाठी ८ व ९ जून राेजी राज्यात झालेल्या अघाेषित संपात सहभागी झालेल्या १०१० राेजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा संपुष्टात अाणण्याची कारवाई एसटी महामंडळातर्फे करण्यात अाली हाेती. मात्र, या सर्व कर्मचाऱ्यांचा सहानुभूतिपूर्वक विचार करून परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी त्यांना पुन्हा कामावर घेण्याचे अादेश दिले अाहेत. 


त्यानुसार अाता या सर्व कर्मचाऱ्यांना १ जुलैपासून नव्याने नियुक्ती दिली जाईल. संपकरी रोजंदारी कर्मचारी महामंडळाच्या सेवेत दोन ते तीन महिन्यांपूर्वीच रुजू झाले होते. मात्र, ते नियमबाह्यरीत्या संपात सहभागी झाले हाेते, त्यामुळे एसटीचे माेठे नुकसान झाले तसेच प्रवाशांचीही गैरसाेय झाली हाेती. 

बातम्या आणखी आहेत...