आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गारपीट नुकसानग्रस्तांसाठी राज्याचे 313 कोटी मंजूर, अध्‍यादेश जारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्याच्या विदर्भ व मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यांत जोरदार गारपीट व अवकाळी पाऊस झाला होता. त्यात शेतपिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्याच्या भरपाईसाठी फडणवीस सरकारने राज्य आपत्ती निवारण निधीमधून (एसडीआरएफ) ३१३ कोटी रुपये मंजूर केले आहेत.

 

त्याबाबतचा शासन आदेश महसूल विभागाने नुकताच जारी केला आहे. दरम्यान, बुधवारी (दि.७)आणि गुरुवारी (दि.८ ) पुन्हा विदर्भ तसेच उत्तर व मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांना गारपीट व वादळी वाऱ्याचा तडाखा बसेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.  
या नैसर्गिक संकटामुळे राज्याच्या १९ जिल्ह्यांतील २ लाख ९३ हजार २८९ हेक्टर क्षेत्रावरील उभ्या पिकांचे गारपीट व अवकाळी पावसाने नुकसान झाले होते. गारपीट आणि गुलाबी बोंडअळीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे २ हजार ४०० कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे.   

 

मात्र अद्यापही केंद्र सरकारने त्यासंदर्भातील कोणताही निधी पाठवलेला नाही. मात्र राज्य सरकारने राज्य आपत्ती निवारण निधीमधून ३१३ कोटी मंजूर केले आहेत. केंद्राचा निधी प्राप्त झाल्यानंतर तो राज्य आपत्ती निवारण निधीमध्ये समायोजित करण्यात येईल, अशी माहिती कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सांगितले.  


मंजूर रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाणार आहे. या नुकसान भरपाईच्या रकमेतून जिल्हा किंवा कोणत्याही व्यापारी, खासगी बँका शेतकऱ्यांच्या कर्जाची वळती करून घेऊ शकणार नाहीत, असेही कृषिमंत्री फुंडकर यांनी स्पष्ट केले आहे. 

 

अाैरंगाबादसाठी हवेत १३० काेटी
अमरावती विभागासाठी १३९ कोटी, औरंगाबाद विभागासाठी १३० कोटी, नागपूर विभागासाठी ४२ तर नाशिक महसूल विभागासाठी ९६ कोटी ७२ लाख रुपयांच्या नुकसान भरपाई देण्यासाठी आवश्यकता आहे. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना नुकसान झालेल्या पिकांचे पंचनाम्याचे आदेश देण्यात आलेले होते. एकूण ३३ टक्के नुकसान झालेल्या शेतकऱ्यास  कमाल दोन हेक्टरपर्यंतची भरपाई दिली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...