आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यमंत्रिपदाचा दर्जा मला नाही, तर सिद्धीविनायक मंदिराच्या अध्यक्षपदाला : बांदेकर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळाला देण्यात आला आहे. परतु, बांदेकर यांनी हा दर्जा आपल्याला मिळाला नसून तो सिद्धीविनायक गणपती मंदिराच्या अध्यक्षाला मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. हा दर्जा कोणत्याही व्यक्तीला नाही, तर तो त्या पदाला आहे असे त्यांनी म्हटले आहे. बांदेकरांच्या या वक्तव्याची सर्व स्थरांतून स्तुति होत आहे.


झी मराठी वाहिनीवरील होम मिनिस्टर या मालिकेतून घराघरांत पोहोचलेले महाराष्ट्राचे लाडके 'भावोजी' आदेश बांदेकर म्हणाले की, 'मी कुठलाही भत्ता घेणार नाही. मला फक्त लोकांची सेवा करायची आहे. राज्यमंत्रिपदाचा दर्जा हा कोणत्याही व्यक्तीला मिळालेला नाही, तर तो सिद्धीविनायक गणपती मंदिराच्या अध्यक्षपदाला मिळाला आहे. सध्या त्या पदावर मी आहे.' 


आदेश बांदेकर यांच्यासह पंढरपूर संस्थानचे अध्यक्ष अतुल भोसले यांनाही राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. तसेच, शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांना देखील राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळाला आहे. कोणत्याही देवस्थानच्या अध्यक्षांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्याची ही पहिलीच वेळ आहे. सरकारच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

 

बातम्या आणखी आहेत...