आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Flashback : जन्नतच्या सफरसाठी त्याने 13 जणांची दिली कुर्बानी, गळे चिरून केली आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - नवी दिल्ली येथील बुराडीमधील हत्याकांडानंतर येथील परिसरातील लोकांना धक्का बसला आहे. या घटनेतील मृत्यूच्या प्रकारानंतर तर आता यात काळी जादू किंवा तंत्र मंत्रचा अँगल असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अशीच एक घटना दोन वर्षांपूर्वी ठाण्यातही घडली होती. या घटनेत हसनैन वरेकर नावाच्या व्यक्तीने त्याच्या कुटुंबातील 13 जणांची गळे चिरून हत्या केली होती. त्यानंतर त्याने स्वतःही आत्महत्या केली होती. फक्त त्याची एक बहीण या प्रकारातून वाचली होती. 


ठाण्यातील या प्रकारानंतर समोर आलेल्या बातम्यांनुसार या प्रकरणाचाही तंत्र मंत्राशी संबंध होता असे समोर आले होते. हसनैन वरेकर नावाच्या तरुणाने आपली पत्नी, चिमुरडी लेक, आई-वडील, बहिणी आणि त्यांच्या पाच मुलांचा जीव घेतला. अत्यंत अंधश्रद्धाळू असल्याने कुटुंबासह जन्नतला जायची त्याची इच्छा होती. त्यासाठीच त्याने कुर्बानीच्या सुऱ्याने गळे चिरून हसनैनने सर्वांची हत्या केली आणि त्यानंतर स्वतः आत्महत्या केली. शेजारी आणि नातेवाईक तसेच मित्रांशी पोलिसांनी केलेल्या चर्चेतून हसनैनबाबत काही गोष्टी समोर आल्या होत्या. 


असा घडला होता प्रकार 
>> हसनैन हा घटनेच्या काही दिवसांपूर्वी फारच धार्मिक झाला होता. त्यापूर्वीच्या पाच वर्षांमध्ये तर तो काळी जादू आणि तंत्र मंत्राच्या जाळ्यातही अडकला, होता अशी माहितीही पोलिसांना मिळाली होती.
>> संपूर्ण कुटुंबाला घेऊन जन्नतच्या सफरीवर जायचे असल्याबाबत त्याने मित्रांशी चर्चा केली होती. 
>> यासाठी त्याने कुटुंबातील सर्वांना मेजवानीसाठी बोलावून त्यांना जेवणातून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर त्याने सर्वांचे गळे चिरले. अगदी चिमुरड्या मुलांचाही त्याने विचार केला नाही. 
>> त्यानंतर त्याने स्वतःदेखिल गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यावेळी ज्या चाकूने त्याने सर्वांचे गळे चिरले तो चाकू त्याच्या हातातच होता. 
>> यातून त्याची केवळ एक बहीण वाचली. तिचा गळा नीट चिरला गेला नव्हता. त्यानंतर तिने स्वतःला एका खोलीत डांबून घेतले त्यामुळे ती वाचू शकली.

 

पुढे वाचा, या घटनेशी संबंधित काही धक्कादायक बाबी...