आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुकाणू समितीची पुन्हा आंदोलनाची घोषणा, शेतक-यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - २००१ पासून शेतकरी कर्जमाफी राबवण्याची लेखी हमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किसान सभेच्या मोर्चाला सोमवारी दिली आहे. त्यावर राज्यातील शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने स्पष्ट नाराजी व्यक्त केली. तसेच सरसकट कर्जमाफीसाठी राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा कार्यक्रमसुद्धा सुकाणू समितीचे नेते रघुनाथ पाटील यांनी जाहीर केला.

 

जनता दल कार्यालयात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील ४० शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची (सुकाणू समिती) बैठक मंगळवारी झाली. त्यामध्ये चार टप्प्यांतील शेतकरी आंदोलनाचा राज्यव्यापी कार्यक्रम आखण्यात आला. विशेष म्हणजे या बैठकीला किसान सभेच्या प्रतिनिधींचीदेखील हजेरी होती.  


पत्रकार परिषदेत पाटील म्हणाले, ‘शेतकरी आंदोलन चार टप्प्यांचे आहे. पहिल्या टप्प्यात ‘कर्जा, कर, बिजली बिल नहीं भरेंगे’ हे आंदोलन १ मार्चपासून सुरू झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील साहेबराव करपे या शेतकऱ्याच्या आत्महत्येला १९ मार्च रोजी ३२ वर्षे होत आहेत. त्यानिमित्त दुसऱ्या टप्प्यात या दिवशी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर सुकाणू समिती अन्न सत्याग्रह करणार आहे. तिसऱ्या टप्प्यात २३ मार्चपासून राज्यभर हुतात्मा अभिवादन शेतकरी जागर यात्रा काढण्यात येणार आहे. त्यामध्ये पाच जथ्थे असतील.

 

प्रत्येक जथ्था रोज पाच सभा घेईल. हे जथ्थे स्वातंत्र्यसंग्राम चळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, मराठवाडा मुक्तिसंग्राम आंदोलन, आदिवासी स्वातंत्र्य चळवळ, दुष्काळविरोधी आंदाेलन, सुरू झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील साहेबराव करपे या शेतकऱ्याच्या आत्महत्येला १९ मार्च रोजी ३२ वर्षे होत आहेत. त्यानिमित्त दुसऱ्या टप्प्यात या दिवशी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर सुकाणू समिती अन्न सत्याग्रह करणार आहे.      

 

तिसऱ्या टप्प्यात २३ मार्चपासून राज्यभर हुतात्मा अभिवादन शेतकरी जागर यात्रा काढण्यात येणार आहे. त्यामध्ये पाच जथ्थे असतील. प्रत्येक जथ्था रोज पाच सभा घेईल. हे जथ्थे स्वातंत्र्यसंग्राम चळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, मराठवाडा मुक्तिसंग्राम आंदोलन, आदिवासी स्वातंत्र्य चळवळ, दुष्काळविरोधी आंदाेलन, भूसंपादनविरोधी आंदोलन यातील ३८० हुतात्म्यांच्या स्मारकांना अभिवादन करेल. अशा राज्यात ५४० सभा होतील. तिसऱ्या टप्प्यातील आंदोलनाचा शेवट पुण्यातील महात्मा जोतिराव फुले यांच्या वाड्यात ३० एप्रिल रोजी होणार आहे. या अभिवादन सभेत सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाच्या निषेधार्थ स्वत:ला अटक करवून घेत असल्याचे अर्ज भरून घेतली जाणार आहेत. १ मे कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला चौथ्या टप्प्यात ३० एप्रिल रोजी शेतकरी स्वत:ला अटक करवून घेणार आहेत.


या पत्रकार परिषदेला सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे काॅ. किशोर ढमाले, शेतकरी संघर्षच्या सुशीला मोराळे, किसान सभेचे सिद्धाप्पा कलशेट्टी, बळीराजा संघटनेचे गणेश जगताप, जनता दलाचे प्रभाकर नारकर, आपचे धनंजय शिंदे, अहमदनगर शेतकरी संघटनेचे बाळासाहेब पठारे, ऊसतोड कामगार संघटनेचे सुभाष काकुस्ते आदी उपस्थित हाेते. 

बातम्या आणखी आहेत...