आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघामुळेच यश मिळाले असते तर नागपुरात भाजपचा कधीच पराभव झाला नसता- सुनील देवधर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘त्रिपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांच्या कामामुळेच भाजपला सत्ता प्राप्त झाली, हा चुकीचा प्रचार अाहे. तसे असते तर संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरात भाजपचा कधीच पराभव झाला नसता, तिथे सुरुवातीपासूनच भाजपचे आमदार, खासदार निवडून आले असते. केरळमध्येही संघाचे काम चांगले आहे.

 

तेथे भाजपचा एकच आमदार आहे. त्यामुळे संघाचे जिथे काम चांगले आहे तिथे भाजपची सत्ता येते हा समज काढून टाकावा,’ असे स्पष्टीकरण त्रिपुरातील भाजपच्या विजयाचे शिल्पकार सुनील देवधर यांनी दिले.   


मुंबई प्रेस क्लबतर्फे अायाेजित संवाद कार्यक्रमात ते बाेलत हाेते. देवधर म्हणाले, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सामाजिक कामांसोबत मातृभूमीसाठी काम करत असतो. संघाची स्वतःची वेगळी विचारधारा आहे. भाजपचीही तीच विचारधारा असल्याने ज्या- ज्या ठिकाणी संघाचे कार्यकर्ते काम करतात तेथे भाजपला लाभ अवश्य मिळतो, परंतु याचा अर्थ संघ भाजपसाठी काम करतो, असे नाही. त्रिपुरात संघ कधीच सशक्त नव्हता. तिथे संघाच्या कार्यकर्त्यांवर नेहमी हल्ले होत असत. १९८० ते २०१० पर्यंत तेथे दहशतवाद होता. संघाच्या चार वरिष्ठ प्रचारकांचे एनएलएफटीने अपहरण केले आणि वर्षभर ताब्यात ठेवून त्यांची हत्याही केली हाेती. त्यामुळे भाजपही त्रिपुरामध्ये अापली विचारधारा रुजवू शकला नव्हता. काँग्रेसही त्रिपुराकडे लक्ष देत नव्हती. त्यामुळे माकपची सत्ता कायम होती. परंतु गेल्या तीन वर्षांत अाम्ही गल्लीबोळात भाजपचा विचार रुजवला.

 

फडणवीसांवर विश्वास
‘त्रिपुरातील माणिक सरकारने सरकारी नोकर भरती न केल्याचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला होता. महाराष्ट्रातही सरकारी आणि शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. त्याबाबत काय सांगाल?’ यावर देवधर म्हणाले, ‘महाराष्ट्रातील परिस्थितीबाबत नक्की माहिती माझ्याकडे नाही. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस त्यांच्या कार्यकाळात रिक्त पदे ते नक्कीच भरतील.

बातम्या आणखी आहेत...