आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पुणे- राष्ट्रवादीचे मावळते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. गेली अनेक वर्षे राज्यात आमदार, मंत्री म्हणून काम केल्यानंतर तटकरे यांना आता संसदेत जाण्याचे वेध लागले आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीयमंत्री अनंत गिते यांच्याकडून केवळ शे-दोनशे मतांनी पराभूत झालेल्या तटकरेंनी मात्र 2019 साली लोकसभेत जाण्याचा चंग बांधल्याचे स्पष्ट होत आहे.
आज पुण्यात झालेल्या राष्ट्रवादी कार्यकारिणी बैठकीत शरद पवार यांनी राष्ट्रीय पक्षाध्यक्षपदी पुन्हा एकदा बिनविरोध निवड झाली. याचवेळी तटकरेंना पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी संधी देण्यात आली केले. हाच धागा पकडून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना शुभेच्छा देताना आगामी निवडणुकीत आपल्या नेतृत्त्वाखाली पक्षाला घवघवीत यश मिळवून द्या अशा सूचना केली तर सुनीलजी (तटकरे) तुम्ही आता दिल्लीत या, लोकसभा लढा असे वक्तव्य केले. त्यामुळे तटकरे हे आगामी लोकसभा निवडणुकीत रायगड मतदारसंघाचे उमेदवार असणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. शेकापच्या जयंत पाटील यांनी सुनील तटकरे यांना लोकसभा निवडणुकीसाठी यापूर्वीच पाठिंबा जाहीर केला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.