आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई-दिल्‍लीतील रस्त्यांवर नेमके खड्डे किती? सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला उद्विग्‍न सवाल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्‍ली/ मुंबई- मुंबई आणि दिल्‍ली या देशातल्‍या दोन प्रमुख शहरांत नेमके किती खड्डे आहेत? असा सवाल करत सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारची गुरूवारी चांगलीच कानउघाडणी केली. रस्‍ते सुरक्षेसंबंधी जनहित याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होती. पुरेसा वेळ देऊनही या शहरातील खड्डयांची आकडेवारी सरकारला कोर्टात सादर करता आली नाही. त्‍यावेळी कोर्टाने दिल्‍ली आणि मुंबईमध्‍ये नेमके खड्डे आहेत किती हे कोण सांगू शकेल? खड्डे मोजायला तुम्‍हाला किती अधिकारी लागतील? असा उद्विग्‍न सवाल सरकारला केला.

       
कोर्टाने खडेबोल सुनावल्‍यानंतर सरकारने थातूरमातूर उत्‍तरे देण्‍याचा प्रयत्‍न केला. लवकरच यासंदर्भातील माहिती देण्‍याचा प्रयत्‍न करू, असे सरकारतर्फे कोर्टात सांगण्‍यात आले आहे. 2016 मध्‍ये 1 लाख 60 हजार जणांचा मृत्‍यू रस्‍ते अपघातात झाला आहे. याची गंभीर दखल सुप्रीम कोर्टाने घेतली आहे.  यातील बरेचसे अपघात हे खड्डयांमुळे होत असल्‍याचे निदर्शनास आल्‍यानंतर यासंदर्भातील माहिती सुप्रीम कोर्टाने मागविली होती. मात्र वारंवार वेळ देऊनही सरकारला ती सादर करता आलेली नाही. त्‍यामुळे सुप्रीम कोर्टाला आज केंद्र सरकारला फटकारले.

बातम्या आणखी आहेत...