आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य कर्मचारी मुख्यालयी गैरहजर राहिल्यास निलंबन; राज्य सरकारचा निर्णय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- वरिष्ठांची पूर्वपरवानगी न घेता मुख्यालय साेडणाऱ्या तसेच कामकाजाच्या दिवशी नेमून दिलेल्या वेळेत कार्यालयात उपस्थित न राहणाऱ्या सार्वजनिक अाराेग्य विभागातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना अाता कडक कारवाईला सामाेरे जावे लागणार अाहे. अशा प्रकारचे गैरवर्तन करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा शासन निर्णय राज्य सरकारने गुरुवारी घेतला अाहे. 


राज्य सरकारच्या अख्यत्यारीतील विभागीय कार्यालयांमधील अधिकारी तसेच कर्मचारी अापल्या कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी वेळेत कार्यालयात उपस्थित नसतात, अशा अनेक तक्रारी यापूर्वी आल्या आहेत. त्याचप्रमाणे अापल्या अनुपस्थितीबाबत पूर्व परवानगी घेत नाहीत तसेच त्याबद्दल काेणतीही पूर्वकल्पना अापल्या वरिष्ठांना देत नाहीत. मुख्यालय साेडताना किंवा दाैऱ्यासाठी जाताना देखील वरिष्ठांची पूर्वपरवानगी घेत नसल्याचे राज्य सरकारच्या निदर्शनास अाले अाहे. कार्यालयीन शिस्त अाणि कार्यक्षम प्रशासनाच्या दृष्टीने ही गंभीर बाब असल्याने अधिकाऱ्यांच्या या वर्तनाला चाप लावण्यासाठी राज्य सरकारने या उपाययाेजना केल्या अाहेत. 
वरिष्ठांच्या बैठकांना अनुपस्थिती वाढल्याने निर्णय : प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याने नेहमी कर्तव्यपरायणता ठेवावी अाणि शासकीय कर्मचाऱ्याला अशाेभनीय अशा काेणत्याही गाेष्टी करता कामा नये, अशी स्पष्ट तरतूद महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियमामध्ये विहित अाहे. कार्यालयात अनुपस्थित राहण्यासाठी, मुख्यालय सााेडताना, दाैऱ्यावर वा परदेश दाैऱ्यावर जाण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेणे अावश्यक अाहे. परंतु या काेणत्याही गाेष्टींचे पालन न करता अधिकारी, कर्मचारी विनाअनुमती अनुपस्थित राहणे, दाैरे, परदेश दाैरे करतात. काेणत्याही सबळ कारणाशिवाय मंत्री किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बाेलावलेल्या बैठकांना अनुपस्थितीत राहण्याचे प्रकार वाढल्याचे सरकारच्या निदर्शनास अाले असून कर्मचाऱ्यांच्या या गैरवर्तणुकीला अाळा घालण्यासाठी आता कडक कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला अाहे. 


महिनाभराच्या आत करणार हकालपट्टी 
अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गैरवर्तणूक केली असल्याचे नियुक्त अधिकाऱ्यांना निदर्शनास अाल्यापासून एक महिन्याच्या अात संबंधितांना सेवेतून निलंबित करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल. या सूचनांचे काटेकाेरपणे पालन न झाल्याचे अाढळून अाल्यास त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, असे अादेशात म्हटले अाहे. 


अशा प्रकारे केली जाईल कार्यवाही 
उपसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सक यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करून संचालनालयाला कळवण्याचे अादेश दिले अाहे. माहिती मिळताच मुख्यालयात उपस्थित राहण्याबाबत सूचना देण्यात येतील. या संबंधित कार्यवाहीचा अहवाल शासनाकडे सादर केला जाईल. विनाअनुमती कार्यालयात गैरहजर राहिल्यास निलंबन किंवा शिस्तभंगविषयक कार्यवाही करण्याबाबत नियुक्त अधिकाऱ्यांकडे नावे कळवण्यात येतील. 

बातम्या आणखी आहेत...