आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्यभर आंदोलन; प्रतिलिटर ५ रुपये अनुदानाची मागणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूरातील शिरोळ तालुक्यातील ग्रामदेवतेच्या समाधीला दुग्धाभिषेक घालून आंदोलन सुरू - Divya Marathi
कोल्हापूरातील शिरोळ तालुक्यातील ग्रामदेवतेच्या समाधीला दुग्धाभिषेक घालून आंदोलन सुरू

मुंबई- दूध खरेदी दर वाढवावा, दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर ५ रुपये अनुदान द्यावे अादी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आज मध्यरात्रीपासून राजधानी मुंबईचे दूध तोडण्यासाठी आंदोलन सुरू झाले अाहे. एकीकडे 'स्वाभिमानी'ने या अाक्रमक अांदाेलनाची तयारी सुरू केली असताना सरकारही त्याला थाेपवण्यासाठी सज्ज झाले अाहे. या संपाचा मुंबईकरांच्या दूधपुरवठ्यावर काडीचाही परिणाम होणार नाही, अशी ग्वाही राज्याचे पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली. 

 

UPDATES:

> कोल्हापूरातील शिरोळ तालुक्यातील ग्रामदेवतेच्या समाधीला दुग्धाभिषेक घालून आंदोलन सुरू
> दुधाला प्रतिलिटर पाच रुपये दरवाढ देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी संघटनेचे मध्यरात्रीपासून आंदोलन सुरू... 
> औरंगाबाद: लाडसावंगीत दूध ओतून निषेध करण्यात आला.

> वैजापूर तालुक्यातील हडस पिपळगाव येथे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी नवले कंपनीच्या दुधाच्या टँकर अडवून दुधाच्या बॅग रस्त्यावर फेकल्या. 
> बुलढाण्यात आक्रमक झालेल्या आंदोलकांनी वाघजाळ फाट्याजवळ दुधाची गाडी फोडली.

> शिर्डीतून स्वाभिमानी संघटनेच्या आंदोलक कार्यकर्यांना अटक

> माढा आणि सोलापूर तालुक्यात दूध रस्त्यावर ओतून स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक

> पुणे- बंगळूरू हायवेवर पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू...

> कोल्हापूरहून पोलिस बंदोबस्तात गोकूळचे 12 टँंकर मुंबईला रवाना झाले आहेत.


स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी या अांदाेलनाची हाक दिली अाहे. त्या पार्श्वभूमीवर शेट्टींचे पूर्वाश्रमीचे सहकारी व राज्याचे पणन राज्यमंत्री खोत म्हणाले की, मुंबईला शेजारच्या कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश अशा अनेक राज्यांतून दरराेज दूधपुरवठा हाेताे. मुंबईला पुरवठा करणाऱ्या दूध संघांनी सध्या दोन दिवस पुरेल इतका दूधसाठा केलेला आहे. तसेच मुंबईच्या दुधाची दोन वर्षे गरज भागवेल इतक्या दूधभुकटीचा साठा आहे. त्यामुळे मुंबईकरांना दुधापासून अजिबात वंचित राहावे लागणार नाही.' 

 

हे ही वाचा, 'स्वाभिमानी' ने फोडला नागपूरला जाणारा दुधाचा टँकर, भविष्यात मंत्र्यांच्या गाड्या फोडण्याचा इशारा


दरराेज १ काेटी टन दुग्ध उत्पादन 
राज्यात प्रतिदिन १ कोटी ४ लाख टन दुधाचे उत्पादन होते. पैकी शासकीय दुग्धशाळा प्रतिदिन केवळ ७२ हजार लिटर, तर सहकारी दुग्ध संघाकडून प्रतिदिन ४७ लाख ८२ हजार लिटर्स दुधाचे संकलन करण्यात येते. राज्यात १८८ दुग्ध शीतगृहे असून त्यांची क्षमता ७ हजार ७९६ टन इतकी आहे. 


रोज ४० लाख लिटर जादा 
राज्यात रोज अडीच कोटी लिटर दूध तयार होते. त्यातल्या दीड कोटीची विक्री होते. दुधाला परदेशात मागणी नसल्याने भुकटीचा दर ११० ते १२० रुपये किलोवर आहे. याचा उत्पादन खर्च प्रतिलिटर २२५ रुपये होत असल्याने भुकटी बनवण्याचे काम ठप्प झाले. त्यामुळे रोजचे ४० लाख लिटर दूध अतिरिक्त होऊ लागले आहे, असे खोत म्हणाले. 


शेतकऱ्यांवर सक्ती केल्यास कायदा हाती घेऊ : शेट्टी 
कमी दराने दूध देण्याची सक्ती शेतकऱ्यांवर करू नका, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून प्रसंगी कायदा हातात घेऊन शेतकऱ्यांना संरक्षण देऊ, अशा इशारा संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी पुण्यात दिला. दूध उत्पादक कंपन्यांनी दुधाच्या दरात केलेली फक्त तीन रुपयांची वाढ शेट्टी यांनी फेटाळून लावली. दूध दरात प्रतिलिटर पाच रुपयांची वाढ किंवा तेवढे अनुदान शेतकऱ्यांना मिळेपर्यंत आंदोलनावर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेट्टी म्हणाले,'यासंदर्भात केंद्राने योग्य वेळी निर्णय घेतला नाही. परिणामी दूध भुकटीचे भाव पडले. प्रत्यक्षात लिटरमागे १२ रुपये वाढ मिळू शकते, पण ते फक्त तीन रुपये दरवाढ देत आहेत. ही दूध उत्पादकांची फसवणूक आहे. 

 

निवडणुका तोंडावर आल्याने आंदोलन : सदाभाऊ खोत 
दूध उत्पादकांचा प्रश्न केवळ राज्याचाच नसून देशाचा आहे. राज्य सरकार त्यांच्या हितासाठी शक्य पावले टाकत अाहे. मात्र निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही नेते आंदोलनाचे राजकारण करत आहेत, असा टोला राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टींना अप्रत्यक्षपणे लगावला आहे. 'दूध उत्पादकांना जास्तीचा दर मिळत नाही. पण ग्राहकाला तरी कुठे स्वस्तात दूध मिळते? मग हा मधला पैसा जातो कुठे हे आंदोलकांनी जाहीर करावे. आंदोलकांचेच दूध संघ आहेत, ते दूधाचे भाव वाढवून देतात का, असा सवाल खोत यांनी केला. काही संघांनी उत्पादकांना ३ रुपये दर वाढवून देण्याची घोषणा केली. मग हे आंदोलन कशासाठी? कर्जमाफी झाली. तूर खरेदी झाली. कापूस खरेदी झाली. उसाचा विषय संपला. आता काही राहिले नाही, मग काही तरी काढायचे. जसजशा निवडणुका जवळ येतील तसतसे शेतकरी आंदोलनाचे राज्यात पेव फुटणार, असा आरोपही खोत यांनी केला आहे. 


दूध संरक्षणासाठी अामचेही कार्यकर्ते मैदानात : जानकर 
'ज्यांना अांदाेलन करण्याची इच्छाच अाहे त्यांच्याबद्दल अाम्ही काही बाेलू शकत नाही. मात्र मुंबईला दूध पुरवठा अाम्ही कमी पडू देणार नाही. टँकरला संरक्षण दिले जाईल. उत्पादकांनी न घाबरता पुरवठा करावा, संरक्षणासाठी अामचेही कार्यकर्ते मैदानात अाहेत', असे अाव्हान रासपचे अध्यक्ष व राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी 'स्वाभिमानी'ला दिले. दुधाच्या दरात ३० जुलैपासून ३ रुपये प्रतिलिटर वाढ केली जाईल. जीएसटी कमी झाल्यास अाणखी २ रुपये वाढ हाेईल. म्हणजे अापसूकच ५ रुपये प्रतिलिटर दरवाढ मिळेल, याकडेही जानकर यांनी लक्ष वेधले. शेतकऱ्यांना याेग्य दूध दर द्यावा, यासाठी सर्व दूध संघांना नाेटिसा बजावल्या अाहेत. त्याची अंमलबजावणी न करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचेही जानकर म्हणाले. अांदाेलनादरम्यान दूध रस्त्यावर अाेतणे याेग्य नाही. अापण शेतकऱ्यांची पाेरं अाहाेत, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी अाहे, असे जानकर म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...