आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाणार विदर्भात न्या, नागपुरात अधिवेशनासाठी पुढाकार घेऊ; उद्धव ठाकरेंची ग्वाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पामुळे एक लाख रोजगार निर्माण होणार आहेत. विदर्भाला अशा प्रकल्पाची गरज आहे. म्हणूनच हा प्रकल्प गुजरातला नेण्याऐवजी विदर्भात न्यावा. मुख्यमंत्री नाणार प्रकल्प विदर्भात नेणार असतील तर आम्हीही विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्यासाठी पुढाकार घेऊ, अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पत्रकारांशी बाेलताना दिली. 


भाजपचे बंडखोर आमदार आशिष देशमुख यांनी बुधवारी सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना ठाकरे यांनी तेल शुद्धीकरण प्रकल्प नाणारमधून नक्कीच जाणार, या भूमिकेचा पुनरुच्चार केला.   
आमदार अाशिष देशमुख यांनी नाणारबाबत चांगला अभ्यासपूर्ण प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना दिला आहे, आपल्याला त्यांचे कौतुक वाटत असल्याचे ठाकरे यांनी या  सांगितले. नाणार प्रकल्प आता कोकणात राहणार नाही, हे निश्चितच अाहे. कारण आम्ही तो घालवला आहे. उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्याचा जो निर्णय घेतला आहे, तो नियम आणि कायद्याचा नीट अभ्यास करूनच घेतल्याचे उद्धव म्हणाले.

 

विदर्भात रोजगारांच्या संधी मिळतील.
नाणार येथील नियोजित तेल शुद्धीकरण प्रकल्पाला रत्नागिरी जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांचा विरोध आहे. मात्र, हा प्रकल्प विदर्भात आणल्यास रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील, असे सांगत भाजप अामदार अाशिष देशमुख यांनी हा प्रकल्प विदर्भात नेण्यासाठी मदत करण्याची विनंती उद्धव ठाकरे यांना केली.

 

त्यावर मुख्यमंत्र्यांनीही स्थानिकांच्या भावनांचा अनादर करून प्रकल्प लादणार नसल्याचे सांगितल्याने हा प्रकल्प काेकणात होणार नसल्याचे सांगितले.  त्यामुळे हा प्रकल्प इतर राज्यात जाण्यापेक्षा विदर्भात नेल्यास तेथील लाेकांना चांगला राेजगार मिळू शकेल. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अामदार देशमुख यांच्या प्रस्तावाचा विचार करतील, असा टाेलाही ठाकरे यांनी लगावला.

 

बातम्या आणखी आहेत...