आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ले. जन. निंभोरकर यांना परम विशिष्ट सेवा पदक; सर्वाधिक सन्मान मिळवणारे एकमेव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भारतीय लष्कराने केलेल्या प्रसिद्ध सर्जिकल स्ट्राइकच्या आखणी व अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे तसेच लष्करात मास्टर जनरल ऑफ ऑर्डनन्स म्हणून कार्यरत लेफ्ट. जनरल राजेंद्र रामराव निंभोरकर यांना परम विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित केले आहे.


लष्करातील कामगिरीबद्दल सर्वाधिक पदके मिळवणारे व लष्करी सेवेत असलेले ते एकमेव अधिकारी ठरले आहेत. लष्करी सेवेत विविध पदांवर कार्यरत असताना प्रत्येक वेळी निंभोरकर यांचा सन्मान करण्यात आला. पंजाब रेजिमेंटचे कर्नल निंभोरकर या पदावर पोहोचलेले महाराष्ट्रातील दुसरे अधिकारी आहेत. यापूर्वी लेफ्ट. जनरल थोरात यांनी ही कामगिरी केली आहे.


शेतकरी कुटुंबातील सुपुत्र

वर्धा जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबात जन्मलेले राजेंद्र निंभोरकर यांनी लेह, कारगिल, पूंछ, राजोरी तसेच ईशान्य भारतातही कर्तव्य बजावले.  द्रास व नौशेरा सेक्टरमध्ये कामगिरीबद्दल त्यांना सेना मेडल, अखनूरमध्ये विशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, द. काश्मीरमध्ये अतिविशिष्ट सेवा व परम विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. 

 

ऑपरेशन विजय...
नियंत्रण रेषेवर भारतीय लष्कराने केलेल्या ‘ऑपरेशन विजय’दरम्यान निंभोरकर जखमी झाले होते. त्यांच्या या मोहिमेतील कामगिरीबद्दल त्यांना विशेष पदकाने सन्मानित करण्यात आले.

 

ज्योती यांना अशोक चक्र 
- काश्मीरमध्ये ३ अतिरेक्यांचा खात्मा करणारे हवाईदलातील गरुड कमांडो ज्योती प्रकाश निरालांना मरणोत्तर अशोक चक्र.
- या अतिरेक्यांत एक लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख जकी-उर-रहमानचा पुतण्या होता. 

बातम्या आणखी आहेत...