आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीसीएसच्या शेअरमध्ये 4% वाढ, 6.60 लाख कोटी रुपाय मार्केट कॅप असणारी पहिली भारतीय कंपनी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएस अर्थात टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसचे भांडवल 6.60 लाख कोटी रुपये झाले आहे. असा सन्मान मिळवणारी ही देशातील पहिली कंपनी झाली आहे. सोमवारी हा विक्रम प्रस्थापित करण्यासाठी कंपनीला 8 हजार कोटी रुपयांची गरज होती. सुरुवातीच्या व्यवहारात कंपनीच्या शेअरमध्ये जवळपास 4% वाढ होती आणि मार्केट कॅप 6.62 लाख कोटींवर पोहोचले. 

 

शुक्रवारी होते 6.52 लाख कोटी रुपये भांडवल 
- टीसीएसच्या शेअरमध्ये शुक्रवारी जवळपास 7 टक्के वाढ झाली आणि बीएसईवर 3,406,40 वर बंद झाला. त्यासोबतच कंपनीचे मार्केट कॅप 6.52 लाख कोटींवर पोहोचले होते. तेव्हा शेअरने गेल्या 52 आठवड्यातील उच्चांकी पातळी गाठली. 
- कंपनीचे शेअर सोमवारी बीएसईवर 1% वाढीने 3420 रुपयांवर आणि एनसीईवर जवळपास 1% वाढीसोबत 3424 रुपयांनी उघडला.

 

5 मोठ्या भारतीय कंपन्यांचे मार्केट कॅप 

कंपनी मार्केट कॅप (रुपये)
टीसीएस 6.78 लाख कोटी
रिलायन्स 5.92 लाख कोटी
एचडीएफसी बँक 5.04 लाख कोटी
आयटीसी 3.36 लाख कोटी
इन्फोसिस 2.57 लाख कोटी
बातम्या आणखी आहेत...