आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोटनिवडणुकीत अशी स्थिती असेल तर लोकसभेला कशी असेल- EVM घोळावरून शिवसेनेचा सवाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आजच्या पालघर व भंडारा गोंदिया पोटनिवडणुकीदरम्यान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचा घोळ व तांत्रिक समस्या हे निवडणूक आयोगाचे अपयश आहे. पोटनिवडणुकीतच ही स्थिती असेल तर आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत कशी असेल याचा अंदाजच न केलेला बरा, अशा शब्दांत शिवसेनेचे नेते व खासदार अनिल देसाई यांनी ईव्हीएम     घोळावर भाष्य केले आहे. 

 

ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूका घ्याव्यात असे शिवसेना पहिल्यापासून सांगत आली आहे. आता कुठे इतर पक्षही याबाबत बोलताना दिसत आहेत असे सांगत मतपत्रिकेद्वारे मतदान व निवडणूका घेण्याची मागणी केली.

 

पालघर, भंडारा-गोंदियासह यूपीतील कैराना व नागालँडमधील एका जागेसह लोकसभेच्या 4 जागांवर आज पोटनिवडणूक होत आहे. मात्र, आज सकाळपासून सर्वत्र ईव्हीएम मशिन्स व व्हीव्हीपॅट मशिन्स बंद पडत आहेत. त्यामुळे भाजप सोडून सर्वच पक्षांनी निवडणूक आयोगाच्या मतदान तयारीवर टीका केली. सोबतच निवडणूक आयोगाच्या अधिका-यांना हाताला धरून भाजपच हे घडवून आणत असल्याचा गंभीर केला. 

 

भंडारा-गोंदियात तर अनेक ठिकाणी उच्च तापमानामुळे ईव्हीएम मशिन्सचे सर्व्हर बंद पडले आहेत. त्यामुळे मतदान करण्याची प्रक्रिया ठप्प झाली होती. याबाबत निवडणूक आयोगाची पुरेपूर तयारी नसल्याचा आरोप शिवसेनेसह प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. 

 

पालघरमध्ये वसई-विरार-नालासोपारा भागात वर्चस्व राखून असलेले बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांनीही भाजपने निवडणूक अधिका-यांना हाताला धरून रात्रभर ईव्हीएम मशिन्समध्ये सेटिंग करत गडबड केल्याचा आरोप केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...