आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिर्डी: तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची साईबाबांच्या दर्शनाला सपत्निक हजेरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी- तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज शिर्डीत सपत्निक साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानचे उपाध्‍यक्ष चंद्रशेखर कदम व उपजिल्‍हाधिकारी धनंजय निकम उपस्थित होते. 

 

चंद्रशेखर राव मागील काही दिवसापासून चर्चेत आहेत. राष्ट्रीय राजकारणात काम करण्याची त्यांची महत्त्वकांक्षा आहे. त्यासाठी तेलंगणाची जबाबदारी ते भाऊ किंवा मुलगा यांच्याकडे सोपविण्याचा विचार करत आहेत. तसेच यासाठी बिगर काँग्रेस व भाजपात्तर पक्षाची तिसरी आघाडी स्थापन करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. याचाच भाग म्हणून चंद्रशेखर यांनी मागील महिन्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह ओडिशाचे मुख्यमंत्री नविन पटनाईक यांची भेट घेतली होती. 

 

दरम्यान, तेलंगणात विधानसभेची पुढील वर्षी निवडणुका होत आहे. मात्र, मोदी सरकारच्या लोकसभा-विधानसभा एकत्र निवडणुकीच्या योजनेमुळे ही निवडणूक चार महिनेच आधीच म्हणजे या वर्षाअखेर डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चंद्रशेखर राव हे राज्यातील गणिते जुळवण्याच्या तयारीला लागले आहेत. त्याचाच भाग त्यांनी शिर्डीत सपत्निक येऊन साईबाबांच्या चरणी लीन होत आशीर्वाद मागितला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, चंद्रशेखर राव यांचे साईबाबांचे दर्शन घेतानाचे फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...