आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिन तेंडुलकरला वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर प्रकाश वझे यांचा ठाण्यात अपघाती मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. प्रकाश यांनी सचिनला अनेकदा वैद्यकीय सेवा पुरवली होती. - Divya Marathi
डॉ. प्रकाश यांनी सचिनला अनेकदा वैद्यकीय सेवा पुरवली होती.

मुंबई- क्रिकेटर सचिन तेंडुलकरला वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर प्रकाश वझे यांचा शुक्रवारी एका अपघातात मृत्यू झाला.  वाजे 67 वर्षाचे होते. डॉ. प्रकाश यांनी आयपीएल मॅच दरम्यान नेरूळमधील डीवाय पाटील स्टेडियमवर सचिन तेंडुलकरवर उपचार केले होते. डॉ. वझे हॉस्पिटलमधून घरी जात होते त्याचवेळी त्यांना मुलुंड टोल नाक्यावर एका टेम्पोने उडविले. ते प्रकाश वझे स्पोर्ट्स फाउंडेशनचे चेयरमन सुद्धा होते. असा झाला अपघात...

 

- ठाणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वझे आपल्या क्लिनिकमधील कंपाउंडर हनुमंत हेगडेसोबत ठाण्यातून मुलुंडकडे स्कूटरवरून चालले होते. त्यावेळी त्यांना वेगाने धावणा-या एका टेम्पोने धडक दिली. यानंतर ते जमिनीवर कोसळले. खाली पडताच टेम्पोचे एक चाक त्यांच्या अंगावरून गेले.
- या दुर्घटनेत कंपाउंडर सुद्धा गंभीर जखमी आहे. दोघांना स्थानिक पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये भर्ती केले मात्र, डॉक्टरांनी वझे यांना मत्यू घोषित केले. 
- हेगडेने पोलिसांना सांगितले की, आम्ही दोघे नेहमीच हेल्मेट घालतो. मात्र, त्यावेळी घातले नव्हते. नवघर पोलिसांनी टेम्पो ड्रायव्हर नीलकंठ चव्हाण (वय 48 ) च्या धोकादायक पद्धतीने वाहन चालविण्याचा गुन्हा दाखल केला आहे.

 

क्रिकेटमध्ये वझे यांचे मोठे योगदान-

 

- डॉ. प्रकाश वझे यांनी मेडिकल फील्डला क्रीडा जगाला प्रमोट करण्यासाठी नव्या फॉर्मेट इंट्रोड्यूस केला होता. 
- 1985 मध्ये वझे यांनी 25 षटकांचे आयोजन केले होते. याशिवाय त्यांनी 2009 मध्ये इनडोर आणि आऊटडोर क्रीडा प्रकारांना देणे सुरू केले. ज्यात चेस, कॅरम, बॅडमिंटन आणि टेबल टेनिसचा समावेश आहे. 
- वझे यांना अंपायरिंगसाठी अनेक मेडल्स मिळाली होती. ते आपल्या पत्नीसमवेत राहत होते.

 

पुढे स्लाईडद्वारे वाचा आणि पाहा, सचिनचे डॉक्टर प्रकाश वझे यांच्याबाबत... 

बातम्या आणखी आहेत...