आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाणे पहिले डिजिटल शहर, ठाणेकर डिजिटल सिटिझन्स; तेल अवीवच्या धर्तीवर प्रकल्प

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- देशातील पहिली डिजिटल सिटी होण्याचा मान ठाण्याला मिळणार असून ठाण्याचे नागरिक आता डिजिटल सिटिझन्स म्हणून अोळखले जाणार आहेत. इस्रायलमधील तेल अवीव शहराच्या धर्तीवर ठाणेकरांसाठी आता डिजिटल प्लॅटफाॅर्मची निर्मिती करण्यात येणार आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून महापालिका प्रशासन ते नागरिक, व्यावसायिक ते नागरिक आणि नागरिक ते नागरिक अशा तिहेरी स्तरांवर समन्वय साधण्यात येणार अाहे. महापालिकेच्या सर्व सुविधा आता ठाणेकरांना एका डिजीकार्डच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.   


तेल अवीव  महानगरपालिका आणि फाॅक्सबेरी टेक्नॉलॉजीज प्रा. लि. या कंपनीच्या माध्यमातून ठाणे शहरामध्ये देशातील अशा प्रकारचा हा पहिला प्रकल्प राबवण्यात येत आहे. ‘डिजी ठाणे’ या डिजीसिटी प्लॅटफाॅर्मच्या माध्यमातून नागरिकांसाठीच्या सेवा, नागरिकांचा सक्रिय सहभाग, महापालिकेच्या विविध विभागांशी समन्वय, सरकारी यंत्रणा, नागरिक आणि व्यावसायिक यांच्यामध्ये समन्वयाची एक साखळी तयार करण्यात येणार आहे. यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने प्रत्येक नागरिकाला एक डिजीकार्ड उपलब्ध करून देण्यात येणार असून सेवांचा लाभ घेण्यासाठी एक मोबाइल ॲपदेखील बनवण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून नागरिक महापालिका सेवांची देयके, महापालिकेची मूल्यवर्धित सेवा, नागरिकांना व्यावसायिक फायदे, सरकारी सुविधा आणि शहराशी संबंधित माहिती तत्काळ उपलब्ध होणार आहे. याशिवाय शहरातील विविध माॅल्स, दुकाने या ठिकाणी सुरू असलेले सेल किंवा शहरात होणारे मनोरंजनाचे कार्यक्रम, खेळांचे सामने याबाबतचे वेळापत्रकही या अॅपद्वारे नागरिकांच्या मोबाइलवर उपलब्ध होणार आहे. दरम्यान, अशा प्रकारच्या प्रकल्पाचे नागरिकांनी स्वागत करून यातून चांगली सोय मिळू शकते,  अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

 

शाळा ते वाहतूक; सारे  कळेल अाॅनलाइन  
शहरांमधील शाळा आणि महाविद्यालयांमधील प्रवेश प्रक्रियेसंबंधीची माहिती, शहरात सुरू असलेल्या विकास कामांची माहिती, शहराच्या कोणत्या भागात वाहतुकीची कोंडी आहे, अशा सगळ्या घडामोडींचे क्षणाक्षणाचे अपडेट्स ठाणेकरांना मोबाइलवर उपलब्ध होणार आहेत. तसेच नागरिकांना याचा जास्तीत जास्त फायदा मिळावा यासाठी विविध व्यावसायिकांची नोंदणी करण्यात असून डिजी ठाणे कार्ड आणि ॲपच्या माध्यमातून नागरिकांना या नोंदणीकृत आस्थापनांकडून मूल्यवर्धित सेवांचा लाभही घेता येणार आहे.   

 

 

अादित्य ठाकरेंच्या हस्ते होणार शुभारंभ  
ठाणे महानगरपालिकेच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या जगातील दुसऱ्या आणि भारतातील पहिल्या डिजीसिटी प्लॅटफाॅर्मचे मंगळवारी (२३ जानेवारी) युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या वेळी इस्रायलच्या तेल अवीव शहराचे महापौर डाॅ. राॅन हुलदाय हेदेखील उपस्थित असणार आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...