आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Thane: 2 एसटी बसची भीषण टक्‍कर, 30 प्रवाशी जखमी: सुदैवाने जिवित हानी नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाणे-  शहराच्‍या सॅटीस पुलावर दोन बसची भीषण टक्‍कर होऊन झालेल्‍या अपघातात 25 ते 30 प्रवाशी जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवित हानी झाली नाही. सर्व जखमींवर ठाण्‍याच्‍या सिव्‍हील रुग्‍णालयात उपचार केले जात आहेत.


ठाण्‍याच्‍या स्‍टेशन परिसरातील सॅटीस पूलावर दुपारी 3 वाजण्‍याच्‍या सुमारास हा अपघात झाला. ठाण्‍याहून भिवंडीकडे जाणा-या एसटीचा गिअर बॉक्‍स जॅम झाला होता. त्‍यामुळे ब्रेक लागत नसल्‍याने एसटी पुलावरील कठड्याला जाऊन धडकली. त्‍याचवेळी पाठीमागून येणा-या ठाणे-शहापूर एसटीने या एसटीला जोरदार धडक दिली. यात एसटीचा चक्‍कचूर झाला आहे.  

 

 

बातम्या आणखी आहेत...