आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाण्यात जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना जोमात; अंबरनाथमध्ये BJP कोमात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ठाणे जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेने 7, भाजपने 2 तर 2 काँग्रेस आणि अपक्ष एका जागी विजय मिळवला आहे. अंबरनाथ आणि कल्याण तालुक्याचा निकाल जाहीर झाला असून त्यात शिवसेनेने बरीच आघाडी घेतली. अंबरनाथ पंचायत समितीच्या आठपैकी ७ जागा शिवसेना-राष्ट्रवादी युतीने जिंकल्या आहेत. तर जिल्हा परिषदेच्या 4 पैकी 3 गटातही शिवसेना-राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे.


कल्याण तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 6 जागांपैकी शिवसेना आणि भाजपने 3-3 जागा जिंकल्या आहेत. तर पंचायत समितीच्या 12 जागांपैकी भाजपने 5, शिवसेनेने 4 आणि राष्ट्रवादीने 3 जागा जिंकल्या आहेत. अंबरनाथ आणि शहापूर तालुक्याप्रमाणे कल्याणमध्येही शिवसेना-राष्ट्रवादीची युती झाली, तर पंचायत समिती भाजपच्या ताब्यातून जाऊ शकते.

तिकडे भिवंडी तालुक्यात आत्तापर्यंत जाहीर झालेल्या निकालांमध्ये शिवसेनेने 6 जागा जिंकत आघाडी घेतली आहे. तर भाजपने 3, अपक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी 1 जागा जिंकली आहे.

शहापूर तालुक्यात अद्याप मोजणी सुरु असून जिल्हा परिषदेच्या 11 गटांपैकी शिवसेना-राष्ट्रवादी युतीने 6 जागा जिंकल्या आहेत. तर पंचायत समितीच्या 22 जागांपैकी शिवसेना-राष्ट्रवादी युतीने आत्तापर्यंत 10 जागांवर विजय मिळवला आहे. ही आकडेवारी पाहिल्यानंतर ग्रामीण भागातील मतदारांनी भाजपला धक्का दिल्याचे पाहायला मिळत आहे. 

 

अंबरनाथमध्ये  भाजपला जोरदार धक्का
दरम्यान, अंबरनाथ तालुका पंचायत समिती शिवसेना राष्ट्रवादी युतीच्या ताब्यात आली आहे. एकूण आठ जागांपैकी 6 जागांवर विजय मिळवल आहे. भाजपकडून शिवसेना -राष्ट्रवादीने पंचायत समिती ताब्यात घेतली आहे.

बातम्या आणखी आहेत...