आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमला मिल अग्नितांडव प्रकरण; फरार मोजोसचा मालक युग तुली अखेर शरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- कमला मिल अग्नितांडव प्रकरणातील फरार आरोपी युग तुली १२ दिवसांनंतर अखेर मंगळवारी  पोलिसांना शरण आला. त्याला २० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सोमवारी रात्री उशिरा आपण स्वत: मुंबईतील ना. म. जोशी पोलिस ठाण्यात हजर झाल्याचा दावा तुलीने केला आहे. मात्र, तुलीला आम्हीच अटक केल्याचा दावा पोलिस करत आहेत. 


 घटनेनंतर दोन्ही हाॅटेल्सचे मालक फरार झाले होते. यापैकी मोजोसचा मालक युग पाठकला ६ जानेवारीला अटक झाली, तर ११ जानेवारी रोजी अबोव्हचे तिन्ही मालक पोलिसांना शरण आले. मात्र, मोजोसचा मालक युग फरार होता. अखेर सोमवारी रात्री तुली स्वत: ठाण्यात हजर झाला असता पोलिसांनी त्याला अटक केली.  तुलीने विशेष सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. पण तो फेटाळल्याने तुलीचे बचावाचे सर्व मार्ग बंद झाले होते. दरम्यान, तो हैदराबाद विमानतळावर पत्नीसह दिसल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, आपण कुठेही पळालो नव्हतो, असे सांगत या काळात आपण अमृतसर येथे अटकपूर्व जामिनाच्या निकालाची वाट पाहत असल्याची माहिती युग तुलीने अटकेपूर्वी तयार केलेल्या ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून दिली.

बातम्या आणखी आहेत...