आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भातील गोसीखुर्द सिंचन प्रकल्प घोटाळ्यातील आरोपी ठेकेदाराची आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- विदर्भातील गाजलेल्या गोसीखुर्द सिंचन प्रकल्प घोटाळ्यातील आरोपी जिगर ठक्करने मंगळवारी रात्री मरीन ड्राइव्ह परिसरात स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. व्यवसायात नुकसान झाल्यानंतर त्याच्यावर ९० कोटींचे कर्ज झाल्याने त्याने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिगर मंगळवारी सायंकाळी कारने मरीन ड्राइव्ह परिसरात पोहोचला. हॉटेल मरीन प्लाझासमोर गाडी उभी करून रिव्हॉल्व्हरमधील गोळ्या स्वत:वर झाडल्या. रुग्णालयात नेईपर्यंत वाटेतच त्याचा मृत्यू झाला. गोसीखुर्द प्रकल्पातील निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार झाला होता. यात आरोपींमध्ये ठक्करचे नाव सामील होते. भंडारा जिल्ह्यातील गोदावरी खोऱ्यातील वैनगंगा नदीवर हा महत्त्वाचा सिंचन प्रकल्प वादग्रस्त ठरला आहे.

बातम्या आणखी आहेत...