आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी सरकारच्या काळात लोकशाहीचे वस्त्रहरण; अशोक चव्हाण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 मुंबई - मोदी सरकारच्या कार्यकाळात सातत्याने लोकशाहीचे वस्त्रहरण होत अाहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी कर्नाटकचे भाजप मुख्यमंत्री येदियुरप्पा यांना दुसऱ्या दिवशी आपले बहुमत सिद्ध करण्याचा आदेश देऊन लोकशाहीला वाचवले आहे, असे मत  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी व्यक्त केले.  


भाजपविरोधात काँग्रेस पक्षाने शुक्रवारी राज्यभर ‘प्रजातंत्र बचाओ दिवस’ पाळला. त्यासाठी पक्षाच्या सर्व जिल्हा मुख्यालयी धरणे आंदोलन करण्यात आले. मुंबईत आझाद मैदानाजवळील अमर जवान ज्योतीजवळ मुंबई काँग्रेसच्या वतीने झालेल्या धरणे आंदोलनात अशोक चव्हाण आणि मुंबई अध्यक्ष संजय निरुपम सहभागी झाले होते.   


चव्हाण म्हणाले, मेघालय, मणिपूर व गोवा राज्यात काँग्रेस पक्ष आणि बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल सर्वात मोठे पक्ष होते. तरीसुद्धा भाजपने पैशाचा दुरुपयोग करून अनेक पक्षांचे कडबोळे बनवून सत्ता हस्तगत केली. कर्नाटकात मात्र काँग्रेस व जनता दल सेक्युलर पक्षाच्या आघाडीला तेथील राज्यपालांनी सत्ता स्थापण्यास मान्यता दिली नाही. 

 
मुख्यमंत्रिपदाचे भाजपचे दावेदार बी. एस. येदियुरप्पा यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी सात दिवसांची मुदत मागितली असता तेथील राज्यपालांनी पंधरा दिवसांची मुदत दिली. भारतीय जनता पक्षाकडे बहुमत नाही, हे स्पष्ट असताना भाजपकडून दुर्योधन आणि दुःशासनाच्या माध्यमातून इतर पक्षांचे आमदार फोडण्यासाठी राज्यपालांनी भाजपला खुली सूट दिली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने  आज दिलेला निर्णय भाजपच्या लोकशाहीविरोधी वृत्तीला सणसणीत चपराक असल्याचे चव्हाण म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...