आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच दिवसांचा आठवडा तूर्त नाहीच; सुधीर मुनगंटीवार यांची विधान परिषदेत माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय ५८ वरून ६० करण्याच्या मागणीवर विचार केला जात अाहे. मात्र पाच दिवसांचा अाठवडा करण्याबाबत सरकारचा तूर्त विचार नाही, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.   


शासकीय कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात कपिल पाटील यांनी प्रश्न विचारला होता.  यावर उत्तर देताना अर्थमंत्री मुनगंटीवार म्हणाले,   अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंप तत्त्वावर शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या मागणीवर विचार करण्यासाठी आपल्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची उपसमिती नेमण्यात आली असून ५ बैठकाही झाल्या आहेत.  
सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करण्याच्या अनुषंगाने नेमण्यात आलेल्या खटुआ समितीचा अहवाल लवकरच अपेक्षित आहे. यामध्ये दोन मतप्रवाह आहेत. निवृत्तीची वयोमर्यादा वाढवल्यास युवकांच्या मते त्यांच्या रोजगाराच्या संधी हुकतात. दुसऱ्या बाजूच्या मतप्रवाहानुसार वयोमर्यादा वाढल्यास कर्मचाऱ्याच्या अनुभवाचा लाभ संबंधित विभागाला मिळू शकतो. सेवानिवृत्तीचे वय वाढवल्यास शासनाच्या तिजोरीवर पाच ते सहा कोटींचा भार पडेल, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.  


बालसंगाेपन रजेबाबत लवकरच निर्णय 

अनुदानित शैक्षणिक संस्थांच्या शाळा, कृषी व बिगर कृषी विद्यापीठे व त्यांना संलग्न असलेली महाविद्यालये यामधील पूर्णकालीक शिक्षक व शिक्षकेतर महिला कर्मचारी व पत्नी नसलेल्या पुरुष कर्मचाऱ्यांना संपूर्ण सेवाकालावधीत काही अटी व शर्तींच्या अधीन राहून बालसंगोपन रजा देण्याबाबत शासन विचार करत आहे, असेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...