आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्याची सिंचन टक्केवारी दुप्पट होणार : नितीन गडकरी यांचा दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महाराष्ट्र हा दगडाधोंड्याचा व दुष्काळी प्रदेश असून राज्याची सिंचन क्षमता १८ टक्केच्या पुढे वाढू शकत नाही, असे सांगितले जात होते. मात्र, मोदी आणि फडणवीस सरकार यांनी पूर्वीच्या आघाडी सरकारने अर्धवट ठेवलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करत आणले आहेत. त्यामुळे २०२२ पर्यंत राज्याच्या सिंचन क्षेत्रात १८ लाख हेक्टरची भर पडणार असून सिंचनाची टक्केवारीसुद्धा दुप्पट (४० टक्के) होईल, असा ठाम दावा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री  नितीन गडकरी यांनी केला.  


नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या चार वर्षांच्या कार्यकाळाचा गडकरी यांनी मंगळवारी आढावा घेतला. त्यानिमित्त घेतलेल्या पत्रकार परिषदेला मुंबई भाजप अध्यक्ष व  आमदार अॅड. आशिष शेलार आणि भाजप प्रवक्ते माधव भंडारी उपस्थित होते.  गडकरी म्हणाले, ‘आज कृषी क्षेत्रासाठी कठीण काळ आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर अन्नधान्याचे भाव घसरत आहेत. त्याचा फटका भारतीय शेतकऱ्याला बसत आहे. म्हणून यापुढे आपण केवळ अन्नधान्याचे उत्पादन करून चालणार नाही. बांबू, दूध, मध आणि मत्स्य या उपउत्पादनाकडे लक्ष दिले पाहिजे. इथेनाॅल उत्पादनात शेतकऱ्यांना मोठ्या संधी आहेत.’  आघाडी सरकारने अर्धवट ठेवलेले प्रकल्प पूर्ण करण्याचे काम हाती घेतल्याचे ते म्हणाले.

 

शिवसेनेसोबतची युती यापुढेही राहायला हवी  
देवेंद्र अत्यंत सुसंस्कृत व्यक्ती आहे. माणसाच्या इच्छांना अंत नाही. सर्वांच्या सर्व इच्छा फलद्रूप होत नसतात. मोदी सरकारचे ‘अच्छे दिन’ हे ज्याच्या त्याच्या मानण्यावर अाहेत. ४८ महिन्यांत देशाच्या सर्व अपेक्षा पूर्ण कशा होतील. शिवसेनेबरोबरची युती अभंग आहे, ती राहायला हवी. ‘हिंदुत्वा’वर आमची एकवाक्यता आहे.

 

भाजप छोट्या राज्यांच्या बाजूने  
भाजप छोट्या राज्यांच्या बाजूने आहे. राज्याच्या निर्मितीकरिता संसदेत दोनतृतीयांश बहुमत लागते. सध्या ते आमच्याकडे नाही. जेव्हा येईल तेव्हा आम्ही वेगळ्या विदर्भाचा मुद्दा नक्कीचा पुढे करू, असे गडकरी म्हणाले. 

 

बातम्या आणखी आहेत...