आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या हत्येचा कट; पुजारी टाेळीतील १० गुंडांना शिक्षा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी टाेळीच्या दहा गुंडांना मुंबई सत्र न्यायालयाने बुधवारी प्रत्येकी पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. इशरत, अझीम, अश्फाक, आसिफ, शाहनवाज़, फिरोज, शब्बीर, रहीम आणि अनीस अशी अाराेपींची नावे अाहेत.

 

या प्रकरणी एकूण १३ जणांना अटक झाली होती. या सर्व आरोपींवर हत्येचा कट रचणे आणि शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत खटला चालवण्यात आला हाेता. मात्र, इतर तिघांची पुराव्याअभावी निर्दाेष मुक्तता करण्यात अाली.

 

२०१५ मध्ये भट्ट यांच्या हत्येचा कट रचण्यात अाला हाेता. मात्र, पाेलिसांनी ताे उधळून लावत अाराेपींना अटक केली हाेती. 

बातम्या आणखी आहेत...