आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधिमंडळात अात्महत्यांचे प्रयत्न हाेण्याची शक्यता;पाेलिसांकडे माहिती, बंदाेबस्त वाढवला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- विधिमंडळ अधिवेशन काळात राज्यभरातून नागरिक व्यथा मांडण्यासाठी सरकारकडेे येत असतात. परंतु सध्या मंत्रालयात झालेल्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर विधान भवनाभोवतीही सुरक्षेचे कडे अधिक मजबूत केलेे आहे. अधिवेशन काळात आठ- दहा आत्महत्यांचे प्रयत्न होणार असल्याचा अहवाल आल्याने पोलिस सुरक्षा आणखी कडक करण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.   


असे प्रकार टाळण्यासाठी अाता मंत्रालयात जाळ्याही बसवल्या. प्रवेशासाठीही कसून तपासणी करण्यास सुरुवात झाली आहे. मंत्रालयात जे झाले ते विधानभवनात होऊ नये यासाठी पुरेपूर खबरदारी घ्यावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह खात्याला दिल्या आहेत. त्यानुसार विधानभवनाकडे जाणाऱ्या सर्व प्रवेशद्वारांवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाचे ओळखपत्र कसून तपासले जात आहे.   


वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले, अधिवेशन काळात ८ ते १० आत्महत्यांचे प्रयत्न होण्याची शक्यता असल्याचा अहवाल आहे. कोणीतरी बाहेर काही खाऊन आत आला तरी त्यामुळे विधिमंडळाचीच बदनामी होणार आहे. प्रवेशद्वाराच्या समोरही प्रयत्न हाेऊ शकतात, त्यामुळे आम्ही बंदोबस्त वाढवला आहे. राजू शेट्टींचे आंदोलन आमच्या लक्षात आहे. दोन-दोन तीन-तीन च्या गटाने आतमध्ये येतात आणि अचानक आंदोलन करतात. सोमवारी रात्री १०० च्या आसपास नाव नसलेल्या ओळखपत्रांचा गट्ठा आम्ही पकडला आहे. त्याची चौकशी सुरू आहे. त्या ओळखपत्राचा वापर करून कोणीही विधान भवनात प्रवेश करू शकला असता. त्यामुळे तसे काही होऊ नये यासाठी  विधान भवनात प्रवेश करणाऱ्यांचे ओळखपत्र आम्ही तपासत आहोत, असेही या अधिकाऱ्याने दिव्य मराठीशी बोलताना स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...