आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्वविजेत्या भारतीय युवांचे अागमन; जल्लाेषात स्वागत; युवा संघ मुंबईत दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- चाैथ्यांदा वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारतीय युवा क्रिकेट संघाचे साेमवारी दुपारी मायदेशी अागमन झाले. या वेळी मुंबईच्या छत्रपती शिवाजी अांतरराष्ट्रीय विमानतळावर टीमच्या युवा खेळाडूंचे जल्लाेषात स्वागत करण्यात अाले. या प्रसंगी माेठ्या संख्येत चाहत्यांची उपस्थिती हाेती. मुंबई क्रिकेट असाेसिएशनच्या वतीने विश्वविजेत्या युवा टीमचा कर्णधार पृथ्वी शाॅ, टीमचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचे हार घालून स्वागत करण्यात अाले. भारतीय युवांनी शनिवारी फायनलमध्ये तीन वेळच्या किताब विजेत्या अाॅस्ट्रेलियन टीमचा पराभव केला. 

 

पृथ्वीला २५ लाख
मुंबई क्रिकेट असाेसिएशनच्या वतीने (एमसीए) कर्णधार पृथ्वी शाॅला २५ लाखांच्या बक्षिसाची घाेषणा केली. त्याच्या नेतृत्वाखाली युवा संघाची वर्ल्डकपमधील कामगिरी उल्लेखनीय ठरली.

बातम्या आणखी आहेत...