आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यपालांच्या अभिभाषणाचा अनुवाद नसणे हा तर महाराष्ट्राचा अपमान: धनंजय मुंडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विधिमंडळ परिसरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ विराेधकांनी अांदाेलन केले. - Divya Marathi
विधिमंडळ परिसरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ विराेधकांनी अांदाेलन केले.

मुंबई- राज्यपालांच्या अभिभाषणाचा मराठीतील अनुवाद उपलब्ध नसल्याचे पडसाद साेमवारी विधान परिषदेत उमटले. मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येलाच असा प्रकार घडणे हा मराठी भाषा आणि तमाम मराठी जनतेचा अवमान असून या घटनेची संपूर्ण चौकशी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभागृहात केली. 

 

अभिभाषण सुरू झाल्यानंतर सदस्यांना १४ मिनिटे हेडफाेनमध्ये अनुवाद एेकायला मिळाला नाही. मराठी भाषा गाैरव दिनाच्या पूर्वसंध्येलाच सरकारने मराठी भाषेचा अवमान केला अाहे. मराठी अनुवादक वेळेवर का पाेहाेचला नाही याची चाैकशी झाली पाहिजे, अशी मागणी मुंडे यांनी केली.  राज्यपालांच्या भाषणाचा मराठीत अनुवाद उपलब्ध नसण्याचा प्रकार महाराष्ट्राच्या निर्मितीपासून कधीच घडलेला नाही. हा राज्यातल्या १२ कोटी जनतेचा अपमान आहे. विरोधी पक्षांनी जागरूक राहून ही बाब निदर्शनास आणून दिली नसती तर  इंग्रजीतले भाषण असेच रेटून नेले असते. ही बाब गंभीर आहे. अनुवाद करण्याची तयारीच करण्यात आली नव्हती तर मराठी भाषेचा अवमान करण्याची सरकारची जाणीवपूर्वक भूमिका यामागे असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी केला. विधान परिषदेत काेणत्याही सदस्यांनी इंग्रजी शब्दांचा वापर केल्यास शिवसेना सदस्य अाणि परिवहन मंत्री दिवाकर रावते तत्काळ हरकत घेत त्या शब्दाचा मराठीत अनुवाद करतात. मराठीच्या मुद्यावर राजकारण करणारी शिवसेना या घटनेच्या वेळी गप्प कशी, असा टाेलाही तटकरे यांनी लगावला.  

 

तावडेंच्या अनुवादाची नाेंद काढून टाका  
राज्यपालांच्या भाषणाचा मराठी किंवा इंग्रजीत अनुवाद करण्याची परंपरा आहे. राज्यपालांनी सुरुवातीला मराठीत भाषण केल्यानंतर पुढचे भाषण इंग्रजीत करणे निषेधात्मक असल्याचे शरद रणपिसे म्हणाले. सचिव उपलब्ध नसताना भाषामंत्री विनोद तावडे यांनी अनुवादकाच्या केबिनमध्ये जाणे ही चुकीची प्रथा असून त्याची नोंद काढून टाकावी अशी सूचना शेकापचे जयंत पाटील यांनी सभापतींना केली.   

 

संध्याकाळपर्यंत येईल अहवाल : पाटील 
विधानभवनात होणाऱ्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी विधानमंडळ सचिवांची असते. मराठी अनुवादाबाबत जे घडले ते निषेधार्ह असल्याचे सांगून सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी  दिलगिरी व्यक्त केली. तसेच या प्रकाराची चौकशी करून संध्याकाळपर्यंत अहवाल मागवण्यात येईल अशी ग्वाही दिली. सभापतींनीही त्यांना संध्याकाळपर्यंत अहवाल देण्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...