आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐका हो ऐका! पुण्यातील हा चहावाला महिन्याला कमावतो 12 लाख रूपये!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चहा सर्व्ह करताना नवनाथ येवले... - Divya Marathi
चहा सर्व्ह करताना नवनाथ येवले...

पुणे- 2014 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत देशात 'चायवाला' या शब्दाला जेवढी प्रसिद्धी मिळाली तेवढी कदाचित एखाद्या शब्दाला मिळाली असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सुरूवातीच्या काळात रेल्वे स्टेशनवर चहा विकला आणि आपल्या मेहनत व कर्तृत्वाच्या बळावर देशाच्या पंतप्रधानापर्यंत मजल मारली. खुद्द मोदी यांनीही अनेकदा देशभरातील जनतेला सांगितले की, मी चहा विकला आहे. आता पुणे शहरातही असाच एक चहावाला चर्चेत आला आहे. नवनाथ येवले नावाचा एक चहावाला महिन्याला 12 लाख रुपये कमावतो. चहाला द्यायची आंतरराष्ट्रीय ओळख.....

 

- पुण्यातील येवले टी हाऊस नावाचा हा टी स्टॉल पुणेकरांत चांगलाच लोकप्रिय आहे. येथे कटिंग चहा 10 रुपयांना तो ही एकाच प्रकारचा मिळतो.
- येवले यांचा हा चहा स्टॉल पुण्यातील गजबज असलेल्या शुक्रवार पेठेत आहे, जेथे लोकांची नेहमीच गर्दी असते. हा स्टॉल सकाळी सात वाजल्यापासून रात्री 11 पर्यंत चालू असते.
- श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात असल्याने येथे दररोज लोकांची ये-जा असते. त्यामुळे येवले यांचा दररोज 30 ते 40 हजार रूपयांची चहाची विक्री होते.
- नवनाथ येवले सांगतात, आम्ही 2011 मध्ये हा टी स्टॉल सुरू केला. 4 वर्षे वेगवेगळ्या चवीचा अनुभव घेऊन एक अंतिम चहाची क्वालिटी ठरवली. 
- एका स्टॉलवरून एकाच दिवसात 3 ते 4 हजार चहा विकले जातात. आम्ही लवकरच 100 सेंटर खोलून याला आंतरराष्ट्रीय ब्रॅंड बनविण्याचा प्रयत्न आहे. 
- आम्ही चहा विकण्यापेक्षा जास्तीत जास्त लोकांना रोजगार देण्याचा विचार केला आहे.
- आम्हाला आनंद आहे की, आमचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

 

सध्या 12 लोकांना रोजगार-

 

- सध्या येवले टी हाऊस नावाचे पुण्यात तीन ठिकाणी चहा स्टॉल आहेत व तेथे एकून 12 लोकांना रोजगार दिला आहे. 
- पुण्यात येवले टी हाउस लोकांत खूपच प्रसिद्ध आहे. त्याचमुळे त्यांचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत चालला आहे. हे टी हाउस अनेक लोकांना प्रेरणा देत आहे जो स्वत:चा आपला व्यवसाय करू इच्छितात.

- नवनाथ या प्रवासाबाबत सांगतो की, माझ्या वडिलांनी सारसबाग भागात 1983 साली एक चहाचा स्टॉल सुरू केला होता. 
- आमचे कुटुंबिय दुधाच्या व्यवसायाशी संबंधित आहे. वडिलांचे स्वप्न होते की, आपल्या चहाची एक वेगळी ओळख असावी. आज त्यांचे स्वप्न केल्याचा आनंद वाटतो.
- वडिलांनी सासवड पुरंदर भागातून येऊन आपला व्यवसाय सुरू केला, आज आम्ही तो 'येवले अमृततुल्य' नावाने प्रसिद्ध केला आहे. 
- काही दिवसापूर्वीच नवनाथने आपली तिसरी शाखा धनकवडी भागातील भारती विद्यापीठ परिसरात सुरू केली आहे. 

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, नवनाथ आणि त्याच्या टी स्टॉलचे काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...