आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अलीबागच्या नागाव Beach वर तिघे बुडाले, रात्रभर सुरु होती शोधमोहिम, सकाळी सापडले मृतदेह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायगड- अलीबागमधील नागावच्या समुद्रात तीन जण बुडाल्याची घटना शुक्रवारी घडली असून तिघांचेही मृतदेह आज सकाळी सापडले आहे. तिघेही मुंबईतील कोपरखैरणे परिसरातील रहिवासी आहेत. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

 

मिळालेल्या माहितीनुसार कोपरखैरणे येथून 13 जणांचा ग्रुप शुक्रवारी अलिबाग तालुक्यातील नागाव सबीचवर फिरण्यास गेला होता. सायंकाळी     ते समुद्रात पोहण्यासाठी उतरले होते. समुद्रात पाण्याचा अदांज न आल्याने चैतन्य किरण सुळे (20), आशिष रामनारायम मिश्रा (20), व फहाद सिद्धीकी (21) हे तिघेजण बुडू लागले. यावेळी त्यांच्या सोबत असलेला इतर युवकांनी आरडाओरड करत स्थानिकांना व समुद्रावर असणाऱ्या जीवरक्षकांना बोलावले मात्र भरतीची लाट आल्याने तिघेही समुद्रात वाहून गेले. 

 

पोलिसांनी रात्रभर या तिघांची शोधमोहीम सुरू केली. यासाठी कोळी बांधवांची मदत घेण्यात आली. मात्र, रात्रभर शोधूनही या तिघांचा शोध लागला नाही. आज सकाळी ओहटीच्या वेळी दोघांचे कोर्लई व एकाचा मृतदेह आग्राव या खाडी किनारी आढळून आला. तिघांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...