आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूषित भाज्यांचा पुरवठा रोखण्यासाठी महापालिका शेतकरी केंद्रे सुरू करणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- दूषित भाज्यांच्या विक्रीला चाप बसून नागरिकांना चांगल्या दर्जाची भाजी मिळावी, यासाठी  शेतकरी केंद्रे सुरू करण्याच्या सूचना मुंबई महापालिकेला केली जाईल, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिली.     


मुंबईच्या पश्चिम उपनगरातील सांताक्रुझ परिसरातील फेरीवाल्यांनी मुंबई महापालिकेच्या पथकाची कारवाई टाळण्यासाठी भाज्यांच्या गोण्या रस्त्याशेजारील नाल्यांमध्ये लपवल्याची बाब गेल्या महिन्यात निदर्शनास आली होती. ही बाब नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक असून या विरोधात अजूनही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याकडे या चर्चेद्वारे लक्ष्य वेधण्यात आले होते. आमदार मनीषा चौधरी यांनी या चर्चेदरम्यान सांगितले, रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई केल्याने अनेक छोट्या मोठ्या गुन्ह्यांना त्यामुळे आळा बसला आहे. त्यामुळे अनधिकृत फेरीवाल्याविरोधातील ही कारवाई सुरूच ठेवत त्यांच्याऐवजी महिला बचत गटांना संधी द्यावी. 


दरम्यान, मध्यंतरी दहा हजार अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात आम्ही कारवाई केली होती, तशाच स्वरुपाची कारवाई केल्यास या प्रकारांना आळा बसून त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांना चाप बसेल, असा मुद्दा विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी  मांडला. आपल्या सरकारच्या काळात ज्या पद्धतीने आम्ही भाजी विक्रीसाठी शेतकरी केंद्रे सुरू केली होती त्याच पद्धतीने अाताही निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली, तर योगेश सागर यांनी टाऊन वेंडींग कमिटीमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींचा समावेश करावा, अशी मागणी केली. 


त्यावर विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी शेतकरी विक्री केंद्रांबाबत केलेली सूचना मुंबई महापालिकेला केली जाईल, असे अाश्वासन नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी आपल्या उत्तरात दिले. तसेच महापालिकेच्या कारवाईपासून वाचण्यासाठी नाल्यात भाज्यांचा साठा केल्याच्या प्रकरणात मुंबई महापालिकेमार्फत वाकोला पोलिस ठाण्यात १० फेब्रुवारी रोजी अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याकरिता तक्रार करण्यात आली अाहे. 

बातम्या आणखी आहेत...