आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाज पालघर, भंडारा लाेकसभा पाेटनिवडणूक; गुरूवारी मतमोजणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/ नागपूर - राज्यातील पालघर व भंडारा- गाेंदिया लाेकसभा मतदारसंघातील पाेटनिवडणुकीसाठी साेमवारी (ता. २८ राेजी) मतदान हाेणार अाहे. तर गुरुवारी (ता. ३१) मतमाेजणी हाेऊन निकाल जाहीर केला जाईल. भाजपचे माजी खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे व भंडाऱ्याचे माजी खासदार नाना पटाेले यांच्या राजीनाम्यामुळे या दाेन्ही   जागा रिक्त झाल्या हाेत्या.  दरम्यान, पालघरमध्ये कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल डहाणू तहसीलदार कार्यालयातील निवडणूक नायब तहसीलदार संजय वामन नागावकर यांना निलंबित करण्यात आले आहे.


पालघरमध्ये शिवसेनेने दिवंगत चिंतामण वनगा यांचा मुलगा श्रीनिवास वनगा यांना अापल्या पक्षातर्फे उमेदवारी दिली अाहे. तर भाजपने  माजी मंत्री राजेंद्र गावित यांना काँग्रेसमधून पक्षात अाणून उमेदवारी दिली. या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागली अाहे.  भंडारा-गाेंदिया मतदारसंघात भाजपचे हेमंत पटले व राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे या दाेन माजी अामदारांत प्रमुख लढत हाेत अाहे. उत्तर प्रदेशमधील कैराना मतदारसंघात व नागालँडमधील एका जागेवरही साेमवारीच लाेकसभा पाेटनिवडणूक हाेणार अाहे.

बातम्या आणखी आहेत...