आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- स्वतंत्र कार्यालयीन इमारत नसलेल्या राज्यातील ग्रामपंचायतींसाठी बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना सुरू करण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचा लाभ लोकसंख्येने लहान, आर्थिकदृष्ट्या कमकुवत अथवा दुर्गम भागातील सुमारे ४ हजार २५२ ग्रामपंचायतींना मिळणार आहे.
या योजनेनुसार स्वतंत्र इमारत नसलेल्या १००० पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना १२ लाख आणि १ ते २ हजारांपर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना १८ लाख निधी मंजूर करण्यात येणार आहे. या निधीपैकी ९० टक्के रक्कम राज्य शासनामार्फत मिळणार असून १० टक्के रक्कम स्वनिधीतून उभारणे आवश्यक आहे. या ग्रामपंचायतींना सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावरदेखील इमारत उभारता येणार आहे. २००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना स्वनिधीतून अथवा सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर इमारत उभारता येईल.
सुमारे १ ते २ हजारांपर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींनी इमारत बांधण्यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी संदर्भात किमान दोन वेळा प्रयत्न करणे आवश्यक आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर बांधकाम करण्यास प्रतिसाद मिळाला नाही तर या योजनेतून इमारत उभारण्यास मान्यता मिळणार आहे.
शासकीय-खासगी भागीदारीतून बांधकाम करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मान्यतेने स्वतंत्र धोरण ठरवण्यास मान्यता देण्यात आली आहे. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना राबवण्यासाठी २०१७-१८ या वर्षासाठी २५ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली. या योजनेसाठी दरवर्षी सुमारे ११० कोटींप्रमाणे पुढील चार वर्षांमध्ये ४४० कोटींची तरतूद करण्यासही मान्यता देण्यात आली.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, आज झालेल्या कॅबिनेटमध्ये फडणवीस सरकारने काय काय घेतले निर्णय...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.