आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Landslide मुंबई-गोवा हायवेवर दरड कोसळली, दोन्ही बाजुला 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबई गोवा महामार्गावर दरड कोसळल्यामुळे वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण झाला असून प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे. दोन्ही बाजुला अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेले चित्र पाहायला मिळत आहे. रायगड जिल्ह्यातील केंबुर्ली तसगांवजवळ प्रचंड पावसामुळे गुरुवारी हे भूस्खलन झाले. 


अत्यंत व्यस्त अशा या मार्गावर महाडजवळ पहाटे पाच वाजेच्या दरम्यान भूस्खलन झाले असल्याची माहिती मिळाली आहे. महामार्गाजवळीर दरड कोसळल्याने रस्ता पूर्णपणे बंद झाला. बुधवारी रात्रभर झालेल्या प्रचंड पावसामुळे ही दरड कोसळली. एनडीआरएफ आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून ढिगारे हटवण्याचे काम सुरू आहे. जवळपास दोन्ही बाजुंनी 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे.

 

सध्या एक लेन वरील ढिगारा दूर करून मार्ग मोकळा करण्यात आला आहे. पुढील काही तासांमध्ये रस्ता पूर्णपणे मोकळा केला जाईल असे एनडीआरएफच्या पथकाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे दुपारपर्यंत या मार्गावर वाहतूक कोंडी राहण्याची शक्यता आहे. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...