आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Mumbai: आणखी एक पूल कोसळण्‍याच्‍या मार्गावर, वाहतूक वळवली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अंधेरीतील गोखले पूल कोसळण्‍याच्‍या दुर्घटनेला एकच दिवस झालेला असताना ग्रँट रोड स्‍टेशनवरील एका पुलाला तडे गेल्‍याचे समोर आले आहे. बीएमसीला याची माहिती मिळताच या पुलावरील वाहतूक वळविण्‍यात आली आहे. तसेच नागरिकांचे येणेजाणेही थांबविण्‍यात आले आहे. ब्रिजग्रँट रोड आणि नाना चौकाला जोडणारा हा पूल आहे. 


पोलिसांनी ट्विट करून दिली माहिती 
बुधवारी मुंबई पोलिसांनी ट्विट करून याची माहिती नागरिकांना दिली. या पुलावरील वाहतूक नाना चौकापासून कॅनेडी पुलाकडे वळविण्‍यात आल्‍याचेही पोलिसांनी सांगितले. एक फोटोही पोलिसांनी शेअर केला असून यामध्‍ये पुलावरील रस्‍त्‍याला तडे गेल्‍याचे दिसत आहे. 


7 महिन्‍यांपूर्वी झाले होते चेकअप 
या पुलावरून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. सातच महिन्‍यापूर्वी सुरक्षिततेसंबंधी या पुलाची तपासणी करण्‍यात आली होती. पुलाला तडे गेल्‍याची माहिती मिळताच वॉर्ड अधिकारी, फायर ब्रिगेड आणि वाहतूक पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेतली. सुरक्षेच्‍या कारणास्‍तव हा पूल सध्‍या बंद करण्‍यात आला आहे.   

 

बातम्या आणखी आहेत...