आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुसळधार पावसामुळे कल्याण-कर्जत रेल्वेसेवा विस्कळीत; मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ठाणे आणि कल्याण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कर्जत-कल्याण रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. कर्जत आणि विठ्ठलवाडी परिसरात रेल्वे रुळावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे कर्जतकडून मुंबईकडे जाणारी रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. कर्जत रेल्वेस्थानकातही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे प्रगती एक्स्प्रेस आणि नंदेड-पनवेल एक्स्प्रेस कल्याणमार्गे वळवण्यात आल्या आहेत. तसेच, पुणे-भुसावळ एक्सप्रेस दौंडमार्गे वळवण्यात आली आहे. 


मुसळधार पावसामुळे मुरबाड तालुक्यातील उल्हास नंदी दुथडी भरून वाहत आहे. मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाल्याने कामानिमित्त मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले आहे. तसेच सुट्टयांचा काळ असल्यामुळे फिरायला निघालेल्यांची देखील कोंडी झाली आहे.

 

पुढील स्लाइडवर पाहा ठाणे परिसरात पावसामुळे साचलेले पाणी...

बातम्या आणखी आहेत...