आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या मराठी सुभेदारामुळे त्रिपुरातील लाल गडावर फडकला भाजपचा भगवा, वाचा....

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुनील देवधर.... - Divya Marathi
सुनील देवधर....

मुंबई- ज्या त्रिपुरात भाजपचा एकही आमदार नव्हता. आमदार तर सोडाच, आत्तापर्यंतच्या निवडणुकांमध्ये पोलिंग एजंटही मिळत नसे अशा त्रिपुरात केवळ तीन वर्षांत भाजपची पाळेमुळे रुजवून पहिल्याच प्रयत्नात कट्टर डाव्यांची आणि क्लीन इमेज असलेल्या माणिक सरकार यांची 25 वर्षांची सत्ता उलटवून चक्क सत्ता प्राप्त करण्याचे शिवधनुष्य भाजपने पेलले. एकही आमदार नसलेला पक्ष निवडणुकीनंतर थेट सत्तेवर आणण्याचा चमत्कार यापूर्वी एन. टी. रामाराव यांनी करून दाखवला होता. त्यानंतर आता त्रिपुरात भाजप सत्तेवर आणण्याचा पराक्रम महाराष्ट्रातून त्रिपुराचा गड ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या सुनील देवधर आणि त्यांच्या टीमने करून दाखवला आहे. आणि याला कारणीभूत आहे सुनील देवधर यांची रणनीती. वन बूथ टेन यूथ ही आमची योजना यशस्वी झाल्याचे स्वतः सुनील देवधर सांगतात. 

 

कोण आहेत सुनील देवधर?
 
विलेपार्ले येथे राहणारे सुनील देवधर सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या गळ्यातील ताईत आहेत. संघटनचातुर्य, बांगला भाषेवर प्रभुत्व, झोकून काम करण्याची वृत्ती हा त्यांचा अत्यंत सशक्त गुण. रा. स्व. संघाचे कट्टर कार्यकर्ते आणि मेघालयात प्रचारक म्हणून अनेक वर्षे काम केलेले सुनील देवधर एम.एस्सी. बी. एड. आहेत. ते ज्येष्ठ पत्रकार वि. ना. देवधर यांचे चिरंजीव. मेघालयात प्रचारक म्हणून गेल्यानंतर त्यांनी मेघालय पिंजून काढला आणि मेघालयाच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यावर भर दिला. तरुणांचे जाळे उभे केले. प्रचारक म्हणून 8 वर्षे काम केल्यानंतर त्यांनी ईशान्येतील तरुणांना उर्वरित भारतासाठी जोडावे म्हणून माय होम इंडिया संस्था स्थापन केली. ईशान्येतील मुलांना शिक्षणासाठी मुंबई, पुण्यात आणून त्यांची येथील परिवारांमध्ये राहण्याची व्यवस्था ते करीत असतात. त्यांचे संघटनकौशल्य पाहून 2012 मध्ये त्यांच्यावर गुजरात निवडणुकीत दाहोद जिल्ह्याची आणि 2014 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. तीन वर्षांपूर्वी त्यांच्यावर त्रिपुराची जबाबदारी सोपवण्यात आली. 

 

पुढे स्लाईडद्वारे वाचा,  सुनील देवधर यांच्यासंबंधित माहिती व फोटोज....

बातम्या आणखी आहेत...