आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खड्ड्यांचा आणखी एक बळी, कल्‍याणमध्‍ये 45 वर्षीय व्‍यक्‍तीला ट्रकने चिरडले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो. - Divya Marathi
फाईल फोटो.

मुंबई - रस्‍त्‍यावरील खड्डयांवरून सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला फटकारण्‍याला काही तास होत नाहीत तोच कल्‍याणमध्‍ये खड्डयांमुळे आणखी एका जणाला जीव गमवावा लागल्‍याचे वृत्‍त आहे. 


द्वारली नाकाजवळ मलंग मार्गावार आज सकाळी 11 वाजता रस्‍त्‍यावरील खड्डे चुकविण्‍याच्‍या नादात 45 वर्षीय व्‍यक्‍ती आपल्‍या दुचाकीसह रस्‍त्‍यावर पडली. त्‍याचवेळी मागून येणा-या ट्रकने त्‍यांना चिरडले. यात त्‍यांचा जागीच मृत्‍यू झाला. पोलिसांनी 'अण्‍णा' असे या व्‍यक्‍तीचे नाव सांगितले आहे. ते एका गोशाळेत कामाला होते. 

 

याप्रकरणी हील लाईन पोलिसांनी ट्रक ड्रायव्‍हरला अटक केली आहे. नसिम मोहमंद जय खान (45) असे त्‍याचे नाव आहे. बेजबाबदारपणे ट्रक चालवण्‍याचा आरोप त्‍याच्‍यावर लावण्‍यात आला आहे. याप्रकरणी अधिक चौकशी सुरू असल्‍याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

 

हाजी मलंग रस्‍त्‍यावरील खड्ड्यासंबंधी येथील रहिवाशांनी सांगितले की, या रस्‍त्‍यावरून दररोज हजारो दुचाकी व चारचाकी वाहने नवीमुंबई आणि बदलापूरकडे जातात. मात्र या रस्‍त्‍याची अवस्‍था अतिशय खराब आहे. रस्‍त्‍यावर प्रचंड खड्डे आहेत. कल्‍याण डोंबिविली महापालिका प्रशासनाला वारंवार विनंती करूनही त्‍यांनी याकडे लक्ष दिलेले नाही.' 


कल्‍याणमध्‍ये दोनच दिवसांपूर्वी खड्डयाने घेतला होता महिलेचा बळी 
दोनच दिवसांपूर्वी 10 जुलै रोजी बाईक खड्डयात गेल्‍याने एका महिलेला मागूल आलेल्‍या भरधाव बसने चिरडले होते. यात महिलेचा जागीच मृत्‍यू झाला होता. ही घटना सीसीटीव्‍ही कॅमे-यातही कैद झाली आहे. 

 

हेही वाचा, 
मुंबई-दिल्‍लीतील रस्त्यांवर नेमके खड्डे किती? सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला उद्विग्‍न सवाल

 

बातम्या आणखी आहेत...