आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारा तास 20 डॉक्टरांची शर्थ; शस्त्रक्रियेतून सयामी जुळ्यांना वेगळे करण्यात अखेर यश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- यकृत, पोट आणि मूत्रपिंडासह कुल्हे हे अवयव जुळलेल्या जुळ्या बाळांना यशस्वीरीत्या वेगळे करून जीवदान देण्याची यशस्वी शस्त्रक्रिया बुधवारी मुंबईतील वाडिया रुग्णालयात करण्यात अाली.  या दोन्ही जुळ्यांमध्ये यकृत, आतडे आणि मूत्राशय हे अवयव समान होते, त्यामुळे ही शस्त्रक्रिया फारच किचकट हाेती. २० डाॅक्टरांच्या टीमने तब्बल १२ तास अथक मेहनत करून ही शस्त्रक्रिया यशस्वी केली.


गर्भावस्थेच्या २४ व्या आठवड्यात शीतल झाल्टे या महिलेच्या गर्भात जुळलेली जुळी बाळे असल्याचे निदान डाॅक्टरांनी केले हाेते. प्रसूतीआधी या जुळ्यांची वैद्यकीय परिस्थिती कशी आहे, याविषयी त्यांच्या पालकांचे समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर वाडिया हॉस्पिटलमध्ये झाल्टे यांची प्रसूती प्रक्रिया पार पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. १९ सप्टेंबर २०१६ रोजी शीतल यांनी लव आणि प्रिन्स या सयामी  जुळ्यांना जन्म दिला. त्यानंतर प्रत्येक फॉलोअप सत्रासाठी लव आणि प्रिन्सला घेऊन येण्याची जबाबदारी झाल्टे कुटुंबीयांनी पार पाडली. त्यांच्यावरील शस्त्रक्रियेआधी अत्यंत व्यापक प्रमाणावर चाचण्या व तपासण्या करण्यात आल्या. यापूर्वी रिद्धी आणि सिद्धी यांच्यावरही वाडिया हॉस्पिटलमध्ये अशीच शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ताे अनुभव गाठीशी असल्याने तसेच लव आणि प्रिन्स यांचा जन्म वाडिया हॉस्पिटलमध्येच झाल्याने येथील डाॅक्टरांना त्यांच्यावरील शस्त्रक्रियेचे नियोजन करणे तुलनेने सोपे होते. ही दोन्ही बाळे सुदृढ होईपर्यंत त्यांची काळजी घेण्यात येईल व उपचार होतील. इतकी दुर्मिळ शस्त्रक्रिया होऊनही दोन्ही बाळांची प्रकृती स्थिर असल्याचे पाहून झाल्टे कुटुंबीय आनंदात आहेत. 

 

अाणखी काही शस्त्रक्रिया हाेणार
एक वर्ष ३ महिन्यांच्या अत्यंत नाजूक वयात लव आणि प्रिन्स यांच्यावर अत्यंत गुंतागुंतीची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. पुढील काही दिवस त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येईल आणि त्यानंतर त्यांच्यावर विविध शस्त्रक्रिया करण्यात येतील, जेणेकरून ते सुदृढ आयुष्य जगू शकतील. या दोन्ही बाळांच्या आतील अवयवांवर त्वचा बसवणे हे सर्वात मोठे आव्हान होते, असे वाडिया रुग्णालयाच्या सीईओ डॉ. मिनी बोधनलवाला म्हणाल्या.

बातम्या आणखी आहेत...