आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'समृद्धी' साठी यूएईचे 7 अब्ज डॉलर; मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गापुढील आर्थिक अडचण आता संपुष्टात आली आहे. बिन झायेद इंटरनॅशनल एलएलसी संयुक्त अरब अमिरात यांनी या प्रकल्पासाठी सुमारे ७ अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करण्यास मंजुरी दिली आहे. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कंपनीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये याबाबत एक संयुक्त करारही करण्यात आला. या कराराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, ‘समृद्धी महामार्गाला पैसा कमी पडणार नाही याची मला खात्री होती. हा मार्ग ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असल्याने याचे काम लवकरात लवकर सुरू करण्याचा आमचा विचार आहे.’ 
बातम्या आणखी आहेत...