आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता मनमोहन सिंग बोलू लागले तर मोदी गप्प झाले, हा काळाने घेतलेला सूडच- उद्धव ठाकरे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मोदी भारतात ‘मौनी बाबा’ असतात, पण परदेशी भूमीवर ते बोलके होतात. स्वदेशात त्यांना बोलूच नये असे वाटते. येथे घडणा-या घटनांचा त्यांना उबग येतो. मग ते परदेशात जातात व स्वदेशातील घटनांवर बोलतात. देशात अनेक मोठ्या राज्यांतील ‘एटीएम’चे रिकामे डबे झाले आहेत, अर्थव्यवस्था कोसळत आहे व मोदी हे परदेशात जाऊन भावनांना वाट मोकळी करून देत आहेत. त्यामुळे आता मनमोहन सिंग बोलू लागले व मोदी गप्प झाले. हा काळाने भाजपवर घेतलेला सूडच म्हणावा लागेल, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे.

 

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नुकतीच टीका केली आहे. 'मोदींजी नेहमी बोलत चला आणि वेळेवर बोलत जा! मी पंतप्रधान असताना नरेंद्र मोदी यांनी ‘नेहमी बोलत चला’ असा सल्ला मला दिला होता. आता मोदी यांनी तोच सल्ला स्वतः आचरणात आणावा,’ अशा शब्दांत मोदींच्या मौनाबाबत मनमोहन सिंग यांनी फटकारले होते. या मुद्यांवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'सामना'त अग्रलेख लिहून मोदी व भाजपवर काळाने उगवलेला हा सूड आहे, अशा शब्दांत टीकास्त्र सोडले आहे. 

 

उद्धव ठाकरे लिहितात की, मनमोहन सिंग यांनी व्यक्त केलेली भावना प्रामाणिक आहे व हवाबाज भक्त सोडले तर संपूर्ण देशाची तीच भावना आहे. तरीही मनमोहन सिंग यांनी जे सांगितले ते बरोबर असले तरी अर्धसत्य आहे. मोदी भारतात ‘मौनी बाबा’ असतात, पण परदेशी भूमीवर ते बोलके होतात. स्वदेशात त्यांना बोलूच नये असे वाटते. येथे घडणाऱ्या घटनांचा त्यांना उबग येतो. मग ते परदेशात जातात व स्वदेशातील घटनांवर बोलतात. सध्या मोदी परदेश दौऱ्यावर आहेत. ते आधी स्वीडन दौऱ्यावर होते. तिथेही स्वदेशातील घटना व घडामोडींवर बोलले. आता ते लंडनला पोहोचले व तेथूनही त्यांनी स्वदेशवासीयांना संदेश दिला आहे. म्हणजे आमच्या पंतप्रधानांना देशातील बऱ्यावाईट घटनांविषयी ‘व्यक्त’ होताना पाहायचे असेल तर भारताची राजधानी लंडन, न्यूयॉर्क, टोकियो, पॅरिस, जर्मनी येथे हलवावी लागेल. ते शक्य नसेल तर दिल्लीचे रूपांतर हे सिनेमातील भव्य सेटप्रमाणे परदेशातील शहरात करावे लागेल. त्यासाठी भाजपवाल्यांना कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची मदत घेता येईल. पंतप्रधान मोदी यांनी लंडन येथे जाऊन भारतातील ‘बलात्कार’ प्रकरणावर दुःख व्यक्त केले आहे. हा त्यांच्या संवेदनशील मनाचा भाग आहे. ते हळवे आहेतच व त्यांच्या मनात अन्यायाविरुद्धची ठिणगी पेटती आहे पण या ठिणगीचा भडका देशात न उडता परदेशात उडताना आपण पाहतो, अशा शब्दांत मोदींच्या भारतातील सूचक मौनाबाबत टीकास्त्र सोडले आहे. 

 

पुढे स्लाईडद्वारे आणखी वाचा, उद्धव ठाकरेंनी कशा शब्दांत मोदींवर सोडले टीकास्त्र....

बातम्या आणखी आहेत...