आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • उद्धव ठाकरेंनी केंद्रीय मंत्री धमेंद्र प्रधानांची भेट नाकारली, Uddhav Thackeray Refused To Meet Union Minister Dharmendra Pradhan

Nanar Project: शिवसेना-भाजपत तणाव, उद्धव ठाकरेंनी नाकारली पेट्रोलियम मंत्र्याची भेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- रत्‍नागिरीतील नाणार तेल शुद्धीप्रकल्‍पावरून शिवसेना व भाजप यांच्‍यामधील संबंध पुन्‍हा एकदा ताणले गेल्‍याचे चित्र आहे. या प्रकल्‍पाला उद्धव ठाकरेंकडून हिरवा कंदिल मिळावा म्‍हणून केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांनी उद्धव ठाकरेंकडे भेटीसाठी उद्याची वेळ मागितली होती. मात्र उद्धव ठाकरेंनी भेटीचा प्रस्‍ताव धुडकावून लावला आहे.

 

स्‍थानिकांचा व राज्‍य सरकारमध्‍ये घटक पक्ष असलेल्‍या शिवसेनेचा या प्रकल्‍पाला विरोध असतानाही दिल्‍लीमध्‍ये सोमवारी या प्रकल्‍पाच्‍या सांमजजस्‍य करारावर स्‍वाक्ष-या करण्‍यात आल्‍या. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत या स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्‍या. पुर्णत्‍वास आल्‍यास आशियातील हा सर्वात मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्‍प तर जगात तिस-या क्रमाकांचा प्रकल्‍प असणार आहे. जवळपास 3 लाख कोटींचा हा प्रकल्‍प आहे.


या प्रकल्‍पाच्‍या संदर्भात मंत्री धमेंद्र प्रधान यांनी भेटीसाठी वेळ मागितल्‍यानंतर, 'करार करण्‍यापूर्वी कोणतीही माहिती दिली नाही. आता भेटून काय करायचे', असे उत्‍तर उद्धव ठाकरेंकडून गेल्‍याची सुत्रांची माहिती आहे.  


शिवसेनेची भाजपशी सौदेबाजी
'उद्धव ठाकरे यांनी वारंवार नाणार प्रकल्प होऊ देणार नाही, अशा घोषणा केल्या. मात्र, शिवसेनेच्या बोलण्यात आणि कृतीत फरक असल्याचे वारंवार दिसून आले आहे. नाणारला विरोध आहे, असे दाखवून शिवसेना भाजपशी सौदेबाजी करत आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यात यांचा सौदा बहुतेक ठरला आहे.', अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांनी दिल्‍लीतील करार झाल्‍यानंतर केली होती.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, दिल्‍लीत प्रकल्‍पाच्‍या सामंजस्‍य करारावर स्‍वाक्षरी करताना उपस्थित मंत्री धमेंद्र प्रधान...

 

 

बातम्या आणखी आहेत...