आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाणारप्रकरणी शिवसेनेकडून वचनभंग, उद्धव ठाकरेंनी माफी मागावी : अशोक चव्हाण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- नाणार रिफायनरी प्रकल्पासाठी सोमवारी केंद्र सरकारने सौदी अराम्को आणि अॅडनॉक या दोन कंपन्यांसोबत ३ लाख कोटींचा आर्थिक सामंजस्य करार केला. यावरून उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पासाठीची भूसंपादन अधिसूचना रद्द केल्याची घोषणा खोटी होती हे सिद्ध झाले आहे. खोटे बोलून जनतेची दिशाभूल केल्याप्रकरणी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि उद्धव ठाकरे यांनी जनतेची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांनी मंगळवारी केली. 


चव्हाण म्हणाले, कोकणातील नाणार प्रकल्पाबाबत (तेलशुद्धीकरण) शिवसेना पक्षाची भूमिका दुटप्पी असून शिवसेनेचे नेते वारंवार खोटे बोलून लोकांची दिशाभूल करत आहेत. नाणार प्रकल्पाच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द करत आहे, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई नाणारमधील जाहीर सभेत म्हणाले होते. मात्र, अद्याप अधिसूचना रद्द झाली नाही. 


शिवसेनेची भाजपशी सौदेबाजी
उद्धव ठाकरे यांनीही वारंवार नाणार प्रकल्प होऊ देणार नाही, अशा घोषणा केल्या. मात्र, शिवसेनेच्या बोलण्यात आणि कृतीत फरक असल्याचे वारंवार दिसून आले आहे. नाणारला विरोध आहे, असे दाखवून शिवसेना भाजपशी सौदेबाजी करत आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यात यांचा सौदा बहुतेक ठरला आहे, असे दिसते. 

बातम्या आणखी आहेत...