आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सत्ता येताच शिवसेना खटकू लागली तर मेहबुबा मुफ्ती जवळची वाटू लागली- उद्धव ठाकरे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- हिंदुत्वाच्या मुद्दयावर शिवसेना-भाजपची युती झाली. गेली 25 वर्षे आपण याच मुद्दय़ावर एकत्र राहिलो, पण आज जरा चांगले दिवस (अच्छे दिन) आले तर यांना शिवसेना खटकू लागली आणि कश्मीरात मेहबुबा मुफ्ती जवळची वाटू लागली याचेच खरे दुःख आहे, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी-शहांसह भाजपला लगावला. देशासाठी आणि हिंदुत्वासाठी आम्ही लढलो आणि लढतही राहू, पण पदरात धोंडे तरी पाडू नका, असे सांगत शिवसेनेच्या आड येऊ नका असेही सुनावले.

 

शिवसेना नेते, खासदार व संपादक संजय राऊत यांच्या ‘रोखठोक’ लेखणीतून साकारलेल्या ‘गोफ’ या पुस्तकाच्या दोन खंडांचे प्रकाशन शनिवारी मुंबईतील शिवाजी मंदिर येथे झाले. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, खासदार कुमार केतकर, त्रिपुरा भाजपचे प्रभारी सुनील देवधर आदी मान्यवर उपस्थित होते.

 

उद्धव ठाकरे म्हणाले, देशाला दिशा दाखवणारा हिंदुत्वाचा विचार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिला. शिवसेनाप्रमुखांनी कडाडून हिंदुत्वाचा प्रचार केला. त्यानंतर त्यांच्यावर झालेले खटले, आरोप याची तमा त्यांनी बाळगली नाही आणि हिंदुत्वावर 1987 साली शिवसेनेचा पहिला आमदार निवडून आला. त्यानंतरच हिंदुत्व निवडणुका जिंकून देऊ शकतं हे अनेक जणांच्या लक्षात आलं अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपला फटकारले.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, उद्धव टाकरेंनी केले संजय राऊतांचे कौतूक.....

बातम्या आणखी आहेत...