आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरोघरी जाऊन भाजपच्या जाहिरातबाजीचे सत्य शोधा; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- जनतेच्या पैशांवर भाजप सरकारने ३,५०० कोटी खर्चून विकासाच्या जाहिराती केल्या. परंतु या योजना जनतेपर्यंत पोहोचल्या का? भाजप सरकारची खरी कामगिरी उघड करण्यासाठी जाहिरातींचे बाड घेऊन जनतेकडे जात सत्यशोधन अभियान सुरू करा व खरी माहिती जनतेपुढे आणा असे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिले. शिवसेनेच्या ५२ वा वर्धापन दिन कार्यक्रमात उद्धव म्हणाले, पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेण्यास विरोध नाही. मला वाटते की, डिसेंबरमध्ये निवडणुका होणार असल्यानेच पावसाळी अधिवेशन नागपुरात घेतले जात आहे. 


शिवसेनेच्या ५२ व्या वर्धापनदिन सोहळ्यात उद्धव म्हणाले... 

नरेंद्र मोदींवर...
हल्ली मोदींच्या घरावर तबकड्या उडतात, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या. ते देशात असतातच कुठे. सर्व देश फिरून झाले, ते आता परग्रहावर दौऱ्यावर जातील. तेथेही ते थापाच मारतील. 


शरद पवारांवर...
पगड्यांमधून तुम्ही मराठी माणसांत फूट पाडण्याचे राजकारण करत आहात. तुम्हाला लोकमान्यांची पगडी चालत नाही, पण इफ्तारची टोपी चालते. 

 

फडणवीसांवर...
मुख्यमंत्री राज्यातील जनतेला वांझोटी स्वप्ने दाखवत अाहेत. आम्ही विकासाच्या आड नाही. परंतु विकास कोणाला हवाय? बुलेट ट्रेनचा फायदा कोणाला होणार आहे? 


अमित शहांवर....
भाजपचे अध्यक्ष येऊन गेले. त्यांनी ऑफर दिली. आणखीही काही ऑफर देत आहेत. शिवसेनेचे महत्त्व किती आहे, हे यावरूनच कळते. 

 

 

काय काय म्हणाले उद्धव ठाकरे... 

- तडजोडीचे राजकारण केले तर शिवसेना पक्षप्रमुख मला कधीही माफ करणार नाहीत- उद्धव ठाकरे 

- मोदींनी थापा मारुन सरकार आणलं - उद्धव ठाकरे
-  जीडीपी म्हणजे गॅस, डिझेल आणि पेट्रोल, ते वाढतायेतच - उद्धव ठाकरे 
- राजकारण करायचं असल्यास डोकी वापरा, दैवतांच्या पगड्या वापरु नका, उद्धव ठाकरेंचा शरद पवारांवर निशाणा
- देशातील हिंदूंना सुरक्षित ठेवा, मग जगभरातील हिंदूंचा कैवार घ्या - उद्धव ठाकरे 
- रमजानमध्ये शस्त्रसंधी करण्याची गरज काय होती? नवरात्र व गणपतीत पाकिस्तानवाले शस्त्रसंधी करतात का?- उद्धव ठाकरे 
- जम्मू-काश्मीर सरकार नालायक आहे, हे कळण्यासाठी तीन वर्षे लागली - उद्धव ठाकरे 
- 600 जवान शहीद झाल्यानंतर भाजपला पीडीपीसोबतच्या सत्तेतून बाहेर पडण्याची अक्कल आली - उद्धव ठाकरे 
- मोदींच्या घरावर तबकडी फिरते म्हणजे आता परग्रहावर दौरे सुरु होतील - उद्धव ठाकरे
- मोदींच्या घरावर तबकडी फिरताना दिसली, आता बातमी येईल मोदी परग्रहावर रवाना कारण आता तिथे थापा मारायच्या आहेत- उद्धव ठाकरे 
- नुसते सदस्य नकोत, लढवय्ये सदस्य हवेत - उद्धव ठाकरे 
- जे आव्हान देण्यासाठी समोर आहेत, त्यांच्या छाताडावर शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवून दाखवेन - उद्धव ठाकरे 
- मला मिस्ड कॉलवाले सदस्य नकोत. मला मर्द सैनिक पाहिजेत - उद्धव ठाकरे 
- गेलेली सत्ता खेचून आणू पण हिंदुत्व सोडणार नाही. माझ्यासाठी नाही, तर जनतेसाठी मला भगवा फडकवयाचा आहे- उद्धव ठाकरे 
- भगवा नुसता फडकणार नाही, भगवा फडकवणारच - उद्धव ठाकरे 
- जिंकलो म्हणून कधी माजलो नाही आणि हारलो म्हणून कधी थांबलो नाही - उद्धव ठाकरे 
- गेली 52 वर्ष असंख्य शिवसैनिकांनी अपार मेहनत घेतली, कष्ट केले. जिंकलो म्हणून माजलो नाही, आणि हरलो म्हणून थांबलो नाही- उद्धव ठाकरे 

बातम्या आणखी आहेत...